सतत रडते म्हणून आईनेच केली मुलीची हत्या; पोलीस कोठडीत रवानगी
नाशिक : शहरात मंगळवारी झालेल्या १४ महिन्याच्या मुलीचा गाला चिरून हत्या झाल्याच्या घटनेला धक्कादायक वळण लागले असून जन्मदात्या आईनेच त्या मुलीचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेने माता न तू वैरिणी असे म्हणण्याची वेळ आली आहे. mother killed 14 month old daughter nashik crime news swara pawar
मंगळवारी (दि. १६) सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता असलेल्या औरंगाबाद रोड येथील साई पॅराडाइज अपार्टमेंटमधील रहिवासी मुकेश पवार यांची मुलगी स्वर पवार हिची गाला चिरून हत्या झाली होती. पोलिसांनी पवार यांच्या घराची टाइप्सनी करून फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे पवार यांची पत्नी योगिता हिने स्वराची हत्या केल्याच्या संशयावरून अटक केली आहे, त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तत्पूर्वी योगिता हिने पती कार्यालयात गेले असताना स्वराची हत्या करत स्वतःच्या हातावर जखमा करून घेतल्या. मात्र हा हत्येचा बनाव असल्याचे उघड होण्यावर आहे.

योगिता हिने बनाव करताना दुपारी घरात अनोळखी व्यक्तीने प्रवेश करत हल्ला केला. मुलीचा गळा चिरून खून केल्यानंतर हल्लेखोराने योगिता यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. आरडाओरड केल्यानंतर संशयित पळून गेल्यानंतर योगिता यांनी भावाच्या बायकोला म्हणजे वहिनीला फोन करून या घटनेची माहिती दिली.
मात्र योगिता यांनी पतीला फोन करून माहिती देणे आवश्यक असताना भावाच्या पत्नीला आधी माहिती दिल्याने पोलिसांनी आधीच खरी घटना काही वेगळीच असल्याचा संशय व्यक्त केला होता. तो संशय खरा निघाला.
नाशिकमधील उच्चभ्रू घरात अशी घटना घडली आहे. कोण केव्हा कोणते रूप धारण करेल याची काहीही शाश्वती नाही. या घटनेला अनेक पैलू असू शकतात. त्या दृष्टीने पोलिसांनी तपस सुरु ठेवला असल्याची माहिती मिळत आहे.
One thought on “धक्कादायक : सतत रडते म्हणून जन्मदात्या आईनेच केली मुलीची हत्या!”