आईने पबजी खेळतांना थांबवले रागातून अल्पवयीन मुलाचा अत्महत्येचा प्रयत्न

त्याची प्रकृती चिंताजनक असून, डॉक्टरांनी ७२ तास देखरेखीखाली ठेवले

नाशिक : ब्लू व्हेल गेमने जगात गोंधळ घालत अनेकांना त्यामुळे आपला जीव गमवाव लागला आहे. त्यात आता मोबाईल वर सर्वात अधिक प्रसिद्ध झालेल्या पबजी या शुटींग गेमची भर पडली आहे. पबजी हा जीवघेणा खेळ जरी नसला तरी त्याचे वेड इतके वाढले आहे की मुले तासान तास खेळत आहेत जर खेळू दिले नाही तर चुकीचे पाऊल उचलत आहेत. यामध्ये शहरातील सातपूर येथील एका अल्पवयीन मुलाने गेम अर्धा सोडवा लागला म्हणून विचारी औषध प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

पबजी गेम खेळताना आईने मोबाईल काढून घेतला म्हणून रागाच्या भरात एका चौदा वर्षीय मुलाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील सातपूरा परिसरातील शिवाजीनगर येथे ही घटना घडली असून  आकाश महेंद्र ओस्तवाल वय१४, शिवाजीनगर  असे या मुलाचे नाव आहे.आकाश महेंद्र ओस्तवाल आईच्या मोबाईल मध्ये पबजी गेम खेळत होता. याचवेळी होस्टेल मध्ये राहणाऱ्या त्याच्या बहिणीने आईसोबत बोलण्यासाठी फोन केला होता, मुलीचा फोन आल्याने आईने आकाशच्या हातातून मोबाईल काढून घेतला होता.

पबजी खेळ
पबजी खेळातील एक दृश्य.

याचवेळी आकाशला गेम खेळताना यातील एका स्टेज  अपूर्ण राहिल्याने राग आला,  या रागातून त्याने घराबाहेर गेला आणि  डेल्टा मैत्रिग नावाचे प्रकाराचे विषारी औषध आणून ते घरामध्ये प्राशन केले.  या विषामुळे काही वेळात आकाशला तात्काळ जोरदार  उलट्या  झाल्या आणि तो बेशुद्ध पडला होता,  यावेळी त्याला शिवाजीनगर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असून, डॉक्टरांनी ७२ तास देखरेखीखाली ठेवले आहे. याबाबत सातपूर पोलिस स्टेशन मध्ये घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.