mocca law शहर पोलिसांची मोठी कारवाई ‘सानू-टोनू-मोनू टोळीवर कारवाई २० गुन्हेगारांवर मोक्का १४ गुन्हेगारांना ताब्यात घेतले

नाशिक शहरात आणि इतर ठिकाणी  चाकू, कोयते हत्यारे सोबत  घेऊन शहरातील नागरी भाग असलेल्या नाशिकरोड ते उपनगरपर्यंत आपली  दहशत माजवत, राजरोसपणे  शरिराविरुध्द गुन्हे करणारे  ‘सानू-टोनू-मोनह्’ या म्हस्के भावंडांच्या टोळीतील २० सराईत गुन्हेगारांवर नाशिक शहर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. यात विशेष असे की या  टोळीने मागील वर्षी नोव्हेंबर मध्ये  योगेश पन्नालाल चायल (२३) याच्यावर कोयत्याने सपासप वार करत ठार केले होते. त्यामुळे पोलिसानी मोठी कारवाई करत आतापर्यंत या गुन्ह्यात टोळीतील ११ संशयित सोबत  तीन अल्पवयीन गुन्हेगार ताब्यात घेतले. चायल खून प्रकरणात पोलिसांना अद्याप १२ संशयितांना अटक करायची आहे. या बारांपैकी सहा संशयित गुन्हेगारांवर मोक्का लावला आहे.mocca law

पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी शहरात खून, प्राणघातक हल्ले यांसारखे शरीराविरुध्दचे गुन्हे  रोखण्यासाठी  परिमंडळ-१ व २ मधील संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांची पूर्ण माहिती काढत यामध्ये  तपासाचे आदेश दिले होते, त्यानुसार नाशिकरोड-उपनगर भागात दहशत माजवून कायदासुव्यवस्थेला वारंवार धोक्यात आणणाऱ्या सानू-टोनू-मोनूच्या टोळीवर अखेर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली.  पोलिसांनी आतापर्यंत या गुन्ह्यात टोळीतील एकूण ११ संशयितांसह तीघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. मात्र उरलेले जवळपास १२ पेक्षा अधिक  संशयित फरार आहेत. यामध्ये काही संशयित गुन्हेगार हे अंधेरी, उल्हासनगर, कल्याण या शहरांमधील आहे. तसेच काही नाशिक शहर व परिसरातील असून त्यांनी शहरातून परजिल्ह्यांमध्ये आश्रय घेतला असून लपून बसले आहे.  सर्वांना लवकरात लवकर अटक करण्यास पोलिसांना यश येईल, असा आशावाद पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उपायुक्त विजय खरात, पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहायक आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे, अनिल शिंदे उपस्थित होते.

हे गुन्हेगार पकडले व केले त्यांना गजाआड
टोळीप्रमुख असलेला  सागर सुरेश म्हस्के ऊर्फ सानू पाईकराव (२२,जेलरोड), हर्ष सुरेश म्हस्के ऊर्फ टोून पाईकराव, साहिल सुरेश म्हस्के ऊर्फ मोनू पाईकराव (२०)रोहित सुरेश लोंढे ऊर्फ भुऱ्या (२१,रा.देवळाली गाव), जय ऊर्फ मारुती वाल्मिक घोरपडे (१८,रा.विहितगाव), राहुल भारत तेलारे ऊर्फ भांडा (१९,रा.बागुलनगर), कलाम सलीम राईन (१९,रा.नाशिकरोड), सत्तू बहीरु राजपुत (२०,रा.जयभवानीरोड), जॉन चलन पडेची (२८,रा.देवळाली कॅम्प), योगेश श्रावण बोडके (२३,रा.पंचवटी), अमन हिरालाल वर्मा उर्फ मामा (३५,रा.समतानगर,अंधेरी), यांच्यासह तीन अल्पवयीन गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी चायल याच्या खूनाच्या गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, दुचाकी वाहनांसह कोयता, चाकू ही हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.mocca law

mocca law
mocca law

The Maharashtra Control of Organised Crime Act, 1999 (Mah. 30/1999) is a law enacted by the state of Maharashtra in India in 1999 to combat organised crime and terrorism.[1] Known as ‘MCOCA’, the Act provides the State Government with special powers to tackle these issues, including powers of surveillance, relaxed evidentiary standards and procedural safeguards, and prescribing additional criminal penalties, including the death penalty. The law was introduced by a coalition government of the Bharatiya Janata Party and Shiv Senamocca law

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.