धक्कादायक : नाशिकमध्ये फिरते सोनोग्राफी केंद्र, अवैध गर्भलिंग निदानाचा संशय

आदिवासी भागात केले जात होते अवैध गर्भलिंग निदान

नाशिक : लोकेट होऊ नये म्हणून सट्टेबाज बऱ्याच वेळेला फिरत्या वाहनातून सट्टेबाजी करत असतात. असाच काहीसा प्रकार अवैध गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या सोनोग्राफी केंद्र चालकाकडून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.या आगोदर जिल्हा रुग्णालयातील डॉ. लहाडे यांनीचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये वैद्यकीय क्षेत्रात काय गंभीर प्रकार सुरु आहेत हे समोर येत आहेत.

सातपूर परिसरात फिरत्या वाहनात गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याची तक्रार आपली मुलगी या वेबसाईटवर आली होती. महानगर पालिकेच्या हद्दीत असल्याने नाशिक मनपा च्या आरोग्य अधिकारी डॉ. आरती चिरमाडे, डॉ. विजय देवकर, डॉ. जितेंद्र धनेश्वर यांच्या पथकाने तपासणी केली. त्यात डॉ. तुषार पाटील याच्या शाकुंतल डायग्नोस्टिक्स सेंटर या नावाने नोंदणीकृत परवाना असल्याचे दिसून आले. या प्रकरणी आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली असून पाटील यांचा परवाना रद्द केला आहे तेसेच त्यांचे क्लिनिक सुद्धा सील केले आहे. याबाबत सर्व पुरावे गोळा करत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

त्यात डॉ. पाटील याच्या मालकीच्या इनोव्हा (एमएच १५ बीडब्ल्यू ५९४९) या आलिशान गाडीच्या डिक्की मध्ये रुग्णांच्या सोनाग्राफी करण्यासाठीची संपूर्ण यंत्रणा आढळून आली. हे सर्व पीसीपीएनडीटी कायद्या नुसार हे उल्लंघन असल्याचे आढळून आल्याने डॉ. पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

illigal sonography

त्यावरील पाटील यांचे सल्लागार समितीला दिलेले उत्तर असमाधानकारक असल्याने कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार पुणे स्थित अतिरिक्त संचालक म्हणजेच समुचित अधिकारी यांना कारवाई करण्याकमी पत्र महापालिकेमार्फत देण्यात आले आहे.

डॉ. पाटील यांच्या या सोनोग्राफी केंद्राची नोंदणी त्र्यंबकेश्वर येथील असून त्यांचे चांदवड भागातही सोनोग्राफी केंद्रे आहेत. शहरी भागात दिसून येण्याची चिन्हे अधिक असल्याने डॉ. पाटील यांनी आदिवासी भागात हे उद्योग सुरु केल्याचा संशय वैद्यकीय पथकाला आहे. यातून एखादे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पूर्व कारवाई म्हणून डॉ. तुषार पाटील यांच्या इनोव्हा कारच्या डिक्कीतील सोनोग्राफी साठी लागणारे दोन प्रोब, व्हिडिओग्राफिक प्रिंटर, लॅपटॉप, गादी, २ उशी, विविध वायर कनेक्शन सर्किट आदी साहित्य सील करण्यात आले आहे.

संशयित डॉक्टर सातपूर येथील असून, त्याच्या सोनोग्राफी केंद्राची नोंदणी निलंबित करतानाच त्याविरोधात न्यायालयीन दावा दाखल करण्याची तयारी महापालिकेने केली आहे.

स्त्रीभ्रूण हत्येविरोधात शासनाने कठोर कायदा केल्यानंतरही काही सोनोग्राफी चालकांकडून बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान केले जात असून, त्यासाठी नाना क्लृप्त्या शोधल्या जात आहेत. सुजाण नागरिक मात्र तक्रार करण्याच्या ठिकाणी तक्रार करत असून यामुळे त्यांच्या या हिंमतीला दाद द्यावीच लागेल.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.