करवाढीचा शहर मनसेकडून निषेध, घरपट्टीच्या कागदांची होळी

नाशिक : नाशिक महानगरपालिकेने बेसुमार केलेल्या घरपट्टी करवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सिडको विभागाच्या वतीने सावतानगर येथे तीव्र निदर्शने करुन घरपट्टीच्या कागदांची होळी करण्यात आली. mns nashik city agitation property tax hike nmc bjp

कोणतीही करवाढ न करता राज ठाकरे यांच्या मनसेच्या सत्ताकाळात दिसणारी विकासकामे झाली होती मात्र भाजपच्या एका वर्षाच्या काळात विकास कामे सोडाच ही घरपट्टी करवाढीची काळी भेट देण्यात आली असा आरोप यावेळी करण्यात आला.

उत्त्पन्न वाढीसाठी आयुक्त मुंढे यांनी मालमत्तेच्या आधारभूत (भांडवली) किमतीवर करवाढ निवासी 28 टक्के, बिगर निवासी 46 टक्के तर औद्योगिक 56 टक्के करवाढ महासभेत मंजूर करण्यात आली आहे. तेव्हा विरोधकांनी या निर्णया विरोधात आपला विरोध दाखवला आहे.

जवळपास १८ वर्षानंतर करवाढ करण्यात आली आहे, यामुळे सर्व विरोधक चांगलेच संतापले आहेत. करवाढीचा बोजा नाशिकच्या जनतेला का ? असा प्रश्न विरोधक विचारत आहेत.

mns nashik city agitation property tax hike nmc bjp

mns nashik city agitation property tax hike nmc bjp

 

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष अनिल मटाले, सिडको विभाग अध्यक्ष रामदास तात्या दातीर, अतुल सानप, बाजीराव दातीर, गणेश मोरे, अरुण दातीर, धीरज भोसले, हेमंत आहेर, मंगेश रोहन, गणेश झोमन, महेंद्र ढिकले, विजय आगळे, विशाल फडोळ, प्रशांत ठाकरे, उदय पवार, महिला पदाधिकारी पुजा धुमाळ, अरुणा पाटील, धनश्री ढोलम, छाया नाडे, कामिनी दोंदे यांच्यासह पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. mns nashik city agitation property tax hike nmc bjp

*************

येथे क्लिक करून आमचे फेसबुक पेज लाईक करा : FB.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.