मनसेच्या शहर सरचिटणीसासह, एक वकील ताब्यात :खंडणीचा गुन्हा दाखल

नाशिक : नाशिक शहरातील असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सरचिटणीस सत्यम खंडाळे यांच्या सह एका वकीला  विरोधात तीन लाख रुपयांची खंडणी मागीतल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून. खंडाळे आणि वकीला पंचवटी पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे.

पंचवटी  पोलिसांनी दिलेली सविस्तर महिती अशी आहे की फिर्याद कर्ता असलेले  संतोष शांताराम तुपसाखरे यांनी त्यांच्या वडीलोपार्जीत 18 एकर जमिनीसाठी न्यायालयात दावा दाखल होता. या केस साठी त्यांनी त्यांचे वकील म्हणून अॅड. संजय खंदारे यांना नियुक्तीपत्र दिले होते. हा दावा उभाराहीला आणि 1996 मध्ये तुपसाखरे बाजुने निकाल लागला होता. यामध्ये ठरलेली सर्व फी वकिलाला दिली गेली होती. या दाव्यात एक कोटी दहा लाख रुपयांत समझोता झाला होता. हा पूर्ण खटला लोक अदालतीत मिटवला गेला होता. यानंतर केस पूर्ण झाली आणि  अॅड. खंदारे यांचे वकिलपत्र काढुन घेतले.

मात्र आता अॅड. खंदारे ने खटल्यात तुपसाखरे तुम्हाला मोठी रक्कम मिळाली असून मला तीन लाख द्या अथवा तुमच्यावर खोट्या केसेस करेल अशी धमकी देत  दमबाजी सुरु केली. या प्रकरणात  13 सप्टेबर, 2017 रोजी तुपसाखरे घरी असतांना मनसेचे शहर सरचिटणीस सत्यम खंडाळे यांनी अॅड. खंदारे यांच्या सांगण्यावरुन तुपसाखरे यांच्याशी संपर्क साधला. ‘खंदारे वकिलांनी सांगितल्याप्रमाणे तीन लाख रुपये आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफीसला आन  सर्व पैसे लगेच जमा कर नाहीतर तुझे हात पाय तोडुन टाकीन  अशी धमकी देत पैसे मागितले आहे . यासंदर्भात तुपसाखरे यांनी शहर पोलिस आयुक्तांशी संपर्क साधला. त्यांची भेट घेऊन याबाबतच माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी खंडाळे यांच्या विरोधात पंचवटी पोलिस स्टेशन येथे  गुन्हा दाखल केला. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.