लोकसभा निवडणूक २०१९ : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सहा सभांचे वेळापत्रक जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष यांच्या विरोधात जनजागृती

महाराष्ट्र : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 8 ते 10 जाहीर सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. यात लोकसभा निवडणूक २०१९ साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष यांच्या विरोधात जनजागृती करण्याचा अजेंडा त्यांनी ठरवला आहे. MNS Chief Raj Thackeray six public addressing scheduled maharashtra loksabha elections 2019

यापैकी पहिल्या सहा सभांचे वेळापत्रक मनसे पक्षातर्फे अधिकृत जाहीर करण्यात आले आहे. यातून आघाडीच्या उमेदवारांचा फायदा झाला तरी चालेल मात्र मोदी आणि शहा या जोडगोळीला भारतीय राजकारणाच्या क्षितिजावरून खाली खेचण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.

असे आहे वेळापत्रक :

सभा क्रमांक 1

दि. 12 एप्रिल : नांदेड
ठिकाण : नवीन मुंडा मैदान
आघाडीचे उमेदवार : अशोक चव्हाण, काँग्रेस
युतीचे उमेदवार : प्रताप पाटील चिखलीकर, भाजपा

सभा क्रमांक 2

दि. 15 एप्रिल : सोलापूर
ठिकाण : कर्णिक नगर क्रीडांगण संध्याकाळी 5.30 वाजता
आघाडीचे उमेदवार : सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस
युतीचे उमेदवार : डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी, भाजपा

सभा क्रमांक 3

दि. 16 एप्रिल : कोल्हापूर
ठिकाण : यशोलक्ष्मी मंगल कार्यालयाजवळचे मैदान, वेळ संध्याकाळी 5.30 वाजता
आघाडीचे उमेदवार : धनंजय महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस
युतीचे उमेदवार :

सभा क्रमांक 4

दि. 17 एप्रिल : सातारा
ठिकाण : जुन्या राजवाड्यासमोरील गांधी मैदान सायंकाळी 5.30 वाजता
आघाडीचे उमेदवार : उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस
युतीचे उमेदवार : नरेंद्र पाटील, भाजपा

सभा क्रमांक 5 :

दि. 18 एप्रिल : पुणे
ठिकाण : सिंहगड रोडवरील शिंदे मैदान
आघाडीचे उमेदवार :
पुणे : मोहन जोशी
बारामती : सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस
मावळ : पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेस
युतीचे उमेदवार :
पुणे : गिरीश बापट, भाजप
बारामती : कांचन राहुल कुल, भाजपा
मावळ : श्रीरंग बारणे, शिवसेना

सभा क्रमांक 6

19 एप्रिल : महाड, रायगड
ठिकाण : महाडमधील चांदे मैदान
आघाडीचे उमेदवार : सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
युतीचे उमेदवार : अनंत गीते, शिवसेना

MNS Chief Raj Thackeray six public addressing scheduled maharashtra loksabha elections 2019

मनसेचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देतांना युतीचा विशेष करून भाजपचा गोंधळ उडत असल्याचे दिसते.

MNS Chief Raj Thackeray six public addressing scheduled maharashtra loksabha elections 2019
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.