पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी तयारी पूर्ण,जिल्ह्यामध्ये १३६ मतदान केंद्रावर

विधानपरीषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीकरिता आज जिल्ह्यातील १३६ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. यात जिल्ह्यातून ९६ हजार १३६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे, भाजपचे डॉ. प्रशांत पाटील, माकपचे राजू (प्रकाश) देसले यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात आहेत. मतदान मुक्त आणि नि:पक्षपातीपणे होईल यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सुचना कुलकर्णी यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी परस्पर समन्वयाने काम करून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी, असे आवाहन कर्मचाऱ्यांना केले. निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती रँडमायझेशन पद्धतीने करण्यात आली असून त्यांना जबाबदारी सोपविण्यात आलेल्या मतदान केंद्राची माहिती साहित्य वाटपाच्यावेळी देण्यात आली. मतदान कर्मचारी आणि साहित्य मतदान केंद्राच्याठिकाणी पोहोचविण्यासाठी २७ बस आणि २५ जीपची सोय करण्यात आली आहे. बागलाण, निफाड आणि मालेगाव तालुक्यासाठी गरजेनुसार अधिक कर्मचारीवर्ग देण्यात आला आहे. साहित्य वितरणापूर्वी निवडणूक कर्मचाऱ्यांना उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी सरीता नरके, तहसीलदार गणेश राठोड , शरद घोरपडे यांनी साहित्य वाटप आणि जबाबदाऱ्यांबद्दल माहिती दिली.

 मतदानासाठी ओळखीचा पुरावा

मतदानासाठी ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, छायाचित्र असलेले पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र, केंद्र सरकार, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम किंवा उद्योग संस्थेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक (खाते ३१ डिसेंबर २०१६ रोजी किंवा तत्पूर्वी उघडलेले असावे),पट्टे किंवा प्रॉपर्टी नोंदणी छायाचित्र असलेले कागदपत्र, अपंगत्वाचा दाखला, आधार कार्ड अथवा रजिस्टर जनरल ऑफ इंडियातर्फे देण्यात आलेले एनपीआरचे स्मार्ट कार्ड अशा १३ पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा सोबत असणे आवश्यक आहे.

मतदानासाठी जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचा वापर
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान पसंतीक्रमानुसार द्यावे लागणार आहे. मतदानासाठी मतदारांना जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचा वापर करावा लागणार आहे. जांभळ्याऐवजी अन्य रंगाच्या स्केचपेनचा वापर मतदानासाठी केल्यास, ती मतपत्रिका रद्द होईल, असे आदेश निवडणूक विभागाने दिले आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.