जिल्हा व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत मित्र विहार संघाला विजेतेपद

नाशिक : श्री यशवंत व्यायाम शाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त यशवंत व्यायामशाळा आणि नाशिक जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या  नाशिक जिल्हा अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा आणि निवड चाचणी स्पर्धेत मित्र विहार स्पोर्ट्स क्लब या संघाने संघर्षपूर्ण सामन्यात यजमान यशवंत व्यायाम शाळेच्या संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
पहिले दोन सेट थोड्या फरकाने हरल्यानंतर मित्र विहारच्या संघाने जोरदार मुसंडी मारली. तिसऱ्या आणि चौथा सेट ही जिंकून २-२ अशी बरोबरी साधली. त्यानंतरच्या पाचव्या निर्णायक सेटमध्येही असाच जोशपूर्ण खेळ करून मित्र विहार स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी हा निर्णायक सेट १५-१३ असा जिंकून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मित्र विहार स्पोर्ट्स क्लब संघातर्फे अमित आहेर, लव सानप. कुश सानप, राहुल गुणवंते, समीर घुगे, अनुप पाठक यांनी चांगला खेळ केल्यामुळे त्यांना हे विजेतेपद मिळविणे शक्य  झाले. तसेच या स्पर्धेत चांगला खेळ केल्याबद्दल संस्थेचा खेळाडू अमित आहेर याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. या खेळाडूंना दिवाकर गायकवाड सर, बळीराम शिंत्रे सर आणि रफीउद्दीन शेख सर समरणार्थ चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी बोलतांना मित्र विहार स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष श्री विनोद कपूर साहेब यांनी सांगतले की, या संस्थेची  व्हॉलीबॉलची फार मोठी परंपरा आहे. या आधीही संस्थेच्या खेळाडूंनी नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे.
यावेळी मित्र विहार स्पोर्ट्स क्लबचे उपाध्यक्ष बाबुराव वाघ, सचिव प्रफुल शहा, संचालक रत्नाकर पटवर्धन, बाबा नायक, मिलिन्द पेंडसे, श्री शिंदे आणि नाशिक जिल्हा  व्हॅलीबॉल असोसिएशनचे सचिव रामदास, व्हॉलीबॉल प्रशिक्षक निलेश  गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.