कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लाखोंची आर्थिक फसवणूक ,श्रीलंकेतील व्यापारी अटकेत

कांदा खरेदीच्या नावे लाखो रुपयांचा अपहार , खोटी कंपनी दाखवून फसवणूक

नाशिक : भारतीय व्यापारी आणि श्रीलंका देशातील व्यापारी य दोघांनी संगनमत करत कांदा उत्पादक शेतकऱ्या कडून कांदा आणि ज्यूट खरेदी करत, त्याचा कोणताही मोबदला न देता जवळपास ७२ लाख १४ हजार ६८१ रुपयांची फसवणूक केली आहे. नाशिक पोलिसांनी या दोघा संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. Millions rupees farmers financial fraud Sri Lanka businessmen arrested 

सविस्तर वृत्त असे की, आडगाव पोलीस्टेशन येथे गुन्हा क्रमाक ४८७/२०१७ प्रमाणे आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तर याच प्रकारे इतर फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी देखील फिर्याद दिल्या आहेत. यामध्ये विजय कुमार चंद्रशेखर ( सेलम,तामिळनाडू), ससिगरन नागराज ( कोलंबो, श्रीलंका) दोघांनी संगतमताने साई पादुका फर्म स्थापन केली. या फार्मचा नागराज देखील भाग आहे असे भासवेल होते. Millions rupees farmers financial fraud Sri Lanka businessmen arrested

दोघांनी या कंपनी अंतर्गत वेगवेगळ्या शेतकऱ्याकडून कांदा आणि ज्यूट पोती खरेदी केली, जवळपास ७२ लाख १४ हजार ६८१ रुपयांचा  माल त्यांनी विश्वास संपादन करत विकत घेतल्याचे सांगितले. मात्र अनेक दिवस होवून सुद्धा कोणतीही आर्थिक परतावा न मिळाल्याने शेतकरी वर्गाने पोलिसांत धाव घेतली. तेव्हा पोलिसांनी सर्व प्रकरण तापासले असता मुख्य आरोपी श्रीलंका देशातील असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी लुकआऊट नोटीस काढली होती.

पोलिस तामिळनाडू पोलिसांच्या संपर्कात होते. नागराज हा मदुराई विमानतळावरून प्रवास करणार असल्याचे समजले आणि नाशिक व तामिळनाडू पोलिसी संयुक्त कारवाई करत नागराज आणि त्याच्या साथीदार चंद्रशेखर याला ताब्यात घेतले आहे. दोघा आरोपींना २० जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात कोणा शेतकऱ्याची फसवणूक झाली असेल तर नाशिक पोलिस आर्थिक गुन्हे शाखा येथे संपर्क करा असे पोलिसांनी आवाहन केले आहे.    

Millions rupees farmers financial fraud Sri Lanka businessmen arrested 

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.