येत्या १६ जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा बंद करणार 

नाशिक : येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा दुधाचा प्रश्न गंभीर होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. कारण दूध दरावरून पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. येत्या १६ जुलैपासून मुंबईला होणारा दूध पुरवठा बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. सदरच्या आंदोलनाला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातूनही मोठा पाठिंबा मिळेल अशी माहिती युवक प्रदेशाध्यक्ष हंसराज वडगुळे यांनी नाशिकमध्ये दिली आहे.milk cut down Mumbai swabhimani shetkari sanghtna agitation 

नाशिकमधून रोज मोठ्या प्रमाणात दुधाचा पुरवठा मुंबईला होत असतो. हा दूध पुरवठा आम्ही थांबवणार अशी माहिती पत्रकार परिषदेत संघटनेच्या वतीने देण्यात आली. विशेष म्हणजे या आंदोलनाला नाशिकातील इतर संघटनांनीही पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता नाशिकमध्ये अधिक असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोबतच मुंबईला होणारा दुधाचा पुरवठा थांबवला तर त्याचा खूप मोठा परिणाम मुंबईवर होऊ शकतो. म्हणून दुधासंदर्भातील निकाल लागेपर्यंत आंदोलन सुरू राहील अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. सरकारने प्रतिलिटर ५  रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे अशी प्रमुख मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

milk cut down Mumbai swabhimani shetkari sanghtna agitation

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.