मिझल-रूबेला लसीकरण मोहिम डिसेंबर 2018: 4,90,218 बालकांना लसीकरण

गोवर व रूबेला हे विषाणु पासून लहान मुलांना होणार आजार असून, भारतात दरवर्षी 50000 बालकांचा गोवरमुळे मृत्यू होतो व 40000 बालकांना व्यंगत्व येते. हे दोनही आजार सन 2020 पर्यंत नियंत्रित करण्याच्या दृष्टीने मिझल रूबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेत 9 महिने ते 15 वर्षाखालील सर्व बालकांना मिझल रूबेला लसीचे एक इंजेक्शन देण्यात येत आहे. Miesel-Rubella Vaccination Campaign December 2018, 4,90,218 Vaccination of Children

मनपा कार्यक्षेत्रात दि. 27/11/2018 पासून सदर मोहिम सुरू झाली असून, सतत 5 आठवडे हि मोहिम राबवुन 4,90,218 बालकांना लस देण्यात येणार आहे.सर्वप्रथम सर्व शाळेतील मुलांना लसीकरण करण्यात येणार असून नंतर अंगणवाडीतील मुलांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मनपाचे सर्व रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुदधा दररोज लस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मिझल लसीमुळे बालकांना न्युमोनिया, अतिसार, मेंदुरोग, कुपोषण सारखे आजार होणार नाही तसेच रूबेला लसीमुळे जन्मजात विकृती जसे बहिरेपणा, लहान मेंदु, मतिमंदत्व, हृदयातील दोष टाळता येईल. Miesel-Rubella Vaccination Campaign December 2018, 4,90,218 Vaccination of Children

सदर लस सुरक्षित व प्रभावी असून जगातील अने‍क देश गेली 40 वर्षे तिचा वापर करीत आहे. मा. शासनामार्फत हि लस विनामुल्य देणेत येत  आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती करणेत येते की त्यांनी त्यांच्या 9 महिने ते 15 वर्षाखालील पाल्यांना शाळेच्या माध्यमातुन तसेच अंगणवाडीच्या माध्यमातुन लसीकरण करून घ्यावे.सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसिदध

Miesel-Rubella Vaccination Campaign December 2018, 4,90,218 Vaccination of Children
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.