Mayor Election मनपात पूर्ण सत्ता भाजपाची, कुलकर्णी महापौर

न जुळलेली आकडेवारी आणि कॉंग्रेस ने ऐनवेळी केलेली मागणी यामुळे नाशिक मनपात महाशिवआघाडीचा प्रयोग फसला आहे. तर भाजपचे फुटणारे नगरसेवकांनी पक्षाची साथ तर दिलीच सोबतच मनसेच्या नगसेवकांनी त्यांचे मत भाजपच्या पारड्यात टाकल्याने भाजपचे महापौर आणि उपमहापौर निवडून आले आहेत. (Mayor Election)

महापालिकेच्या महापौरपदी भाजपाचे सतीश कुलकर्णी विराजमान झाले आहेत. सकाळी झालेल्या निवडणुकीत सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड तर भिकूबाई किसनराव बागुल यांची उपमहापौर म्हणून निवड झाली. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाचही नगरसेवकांनी देखील भाजपाला साथ दिली.

त्याचप्रमाणे भाजपाच्या दहाही बंडखोरांनी बंडखोरी मागे घेत भाजपाला पाठिंबा दिला होता, त्यामुळे भाजपाचा विजयाचा मार्ग सुकर झाला.राज्यात होत असलेल्या महाशिवआघाडीप्रमाणे शहरात शिवसेनेने या करिता  पुढाकार घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरु  केले होते.

त्यातच भाजपाने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने नाराज झाल्याने सध्या शिवसेनेत गेलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक असलेले 10 ते 15 भाजपा नगरसेवक शिवसेनेच्या हाती लागले होते. त्यामुळे 65 नगरसेवक असूनही भाजपा अडचणीत होती. त्यात मनसेने भाजपला पाठिंबा दिला तर महाशिवआघाडीत असलेल्या काँग्रेसने उपमहापौरपद मागितले होते.

त्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण झाली, महाशिवआघाडी फुटली. त्यामुळे भाजपाचा विजय फारच सुकर झाला होता. नाशिक महापालिकेत महाशिवआघाडीचा प्रयोग फसला आणि  महापौर पदापाठोपाठ उपमहापौरपदी याच पक्षाच्या भिकुबाई किसन बागुल यांची बिनविरोध निवड झाली.  उपमहापौरपदासाठी एकूण 11 अर्ज दाखल झाले होते. सर्वांनी माघार घेतल्याने बागुल यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली आहे.

जेष्ठ नगरसेविका ते उपमहापौर

नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ मधून निवडून आलेल्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका भिकूबाई किसनराव बागुल यांची नाशिकच्या उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे भिकूआजींचे वयवर्ष ८२ आहे. सुंदर आणि सुरक्षित नाशिककसाठी काम करावयाचे असल्याचे त्या सांगतात.भिकू आजींची उतारवयात उपमहापौरपदी निवड झाल्यानंतर पंचक्रोशीत आजींची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.  भिकूबाई आजींचा जन्म ११ एप्रिल १९३७ साली जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मांडव येथे झाला. प्राथमिक शिक्षण त्यांचे मूळगावीच झाले.(Mayor Election)

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.