महापौर निवड १४ मार्च रोजी ५ दावेदार

महापौर निवड १४ मार्च रोजी

नाशिक : नाशिक महापालिका महापौर निवड दिवस ठरला असून, या महिन्याच्या मार्च १४ तारखेला निवड होणार आहे. या निअव्द प्रक्रियेसाठी पिठासन अधिकारी म्हणून नाशिकचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महापालिका निवडणुकीत सत्ताधारी मनसेचा मोठा पराभव करत आणि शिवसेना आणि इतर पक्षांना मागे करत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता अनुसूचित जमाती असलेल्या विजयी उमेदवार हा भाजपाकडून महापौर म्हणून निवडणून येणार आहे. तर आय करिता भाजपा मध्ये ५ प्रबळ दावेदार आहेत.त्यामुळे आता महापौर आणि उपमहापौर कोण होतय याकडे नाशिकचे लक्ष आहे.

नाशिकचे महापौरपद अनुसूचित जातीसाठी असून, त्यात भाजपकडे ५ उमेदवार आहेत. रंजना भानसी, सुरेश खेताळे, पुंडलीख खाडे, प्रा. सरीता सोनवणे, रुपाली निकुळे असे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात रंजना भानसी या ज्येष्ठ नगरसेवक असल्याने त्यांचा दावा असला तरी पक्षात अन्यही उमेदवार आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.