Mavala Yuva मावळा युवा महासंघाचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा

महिलांना सक्षम करण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणार :  रुपाली पाटील (Mavala Yuva)

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मावळायुवा महासंघ लवकरच विविध प्रकारची ग्राहक उत्पादने  बाजारात आणणारा आहे. यातून महिलांना स्वयरोजगाराच्या संधी निर्माण करणार असल्याची माहिती मावळा युवा महासंघाच्यासंस्थापक अध्यक्ष रुपाली पाटील यांनी दिली. नुकताच मावळा युवा महासंघाचाराज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा नाशिकमध्ये पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.   

यावेळी कार्यक्रमात हैदराबाद येथे घडलेल्याबलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यात आला. महिला सबलीकरण करण्यासाठी महासंघाकडूनमहिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. राज्यात  विविध स्पर्धा परीक्षांसाठी महापोर्टल सुरू केले आहे. मात्र यात विविध अडचणी विद्यार्थ्यांना येत आहे.

त्यामुळे महापोर्टल बंद करावे. नोकर भरती ही पूर्वी सारखी सरळसेवा पद्धतीने व्हावी असे निवेदन महासंघाकडून अध्यक्ष रुपाली पाटील यांना दिले. मेळाव्यात महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध होतो यावर  सिन्नर तालुका प्रतिनिधी संतोष नवले मार्गदर्शन केले. तर महासंघच्यावतीने तरुणांना शैक्षणिक व व्यावसायिक वाढीसाठी मदत करण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष शाम जाधव, उपाध्यक्ष गोपाल मेमाणे यांनी दिले. 

या मेळाव्याचे प्रास्तविक मावळा युवा महासंघाचेनाशिक शहर अध्यक्ष संदीप पळसकर, सूत्रसंचालन अमोल जाधव यांनी तर आभार अरुणा गोरे यांनी केले. या मेळाव्यासाठी महिला जिल्हा अध्यक्ष सविता जगताप, उत्तरमहाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली कुलकर्णी, सागर थोरात,अमोल जाधव, वाल्मीक पवार, कौस्तुभगोडसे,अपर्णा आहेरराव, लक्षण थापेकर सह  संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते.(Mavala Yuva)

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.