Masalaking युएईत अडकलेल्या भारतीयांना धनंजय दातार यांचा मदतीचा हात

दुबई : कोविड १९ साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे संयुक्त अरब अमिरातीत (युएई) अडकलेल्या भारतीयांसाठी अल अदील समूहाचे अध्यक्ष  मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दोन्ही देशांतील विमानसेवा नुकतीच सुरू झाली. विमानाच्या तिकीटाचे बुकिंग व मायदेशी परतू इच्छिणाऱ्या भारतीयांची कॉन्सुलेटकडे नोंदणीही सुरू आहे. मात्र लॉकडाऊनला तोंड देताना अनेक भारतीयांकडील पैसे संपले आहेत. अशा गरजूंच्या तिकीट खर्चाचा तसेच त्यांच्या कोविड चाचणीच्या शुल्काचा वाटा डॉ. दातार उचलणार आहेत. Masalaking


यासंदर्भात डॉ. दातार म्हणाले,परदेशांत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेला पुढाकार संपूर्ण जगभरात अशा स्वरुपाचा सर्वांत मोठा व व्यापक उपक्रम आहे. कोविड साथीमुळे आखाती देशांत शिक्षण, रोजगार व पर्यटनासाठी गेलेले अनेक भारतीय अडकून पडले आहेत. यात नोकऱ्या गमावलेल्या कामगारांचे प्रमाणही मोठे आहे. हवाई वाहतूक बंद झाल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. या स्थितीत देशबांधवांना सामाजिक बांधीलकीच्या हेतूने मदतीचा निश्चय मी व माझ्या समूहाने केला आहे. 
ते पुढे म्हणाले, हे सहाय्य करताना आम्ही संबंधित यंत्रणांची मंजुरी घेऊनच समन्वय साधत आहोत आणि त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचेही कठोर पालन करत आहोत. यासंदर्भात मी संयुक्त अऱब अमिरातीतील भारताचे कॉन्सुलेट जनरल श्री. विपुल यांच्याशी चर्चा केली आहे. 
डॉ. दातार यांनी विविध संस्था व अनेक व्यक्तींना मदत करुन सामाजिक बांधीलकीही जपली आहे. दुबईमध्ये मराठी उपक्रम राबवण्यास ते मदत करतात. त्यांना मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे सामाजिक उद्योजकता क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.Masalaking

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.