Martyred मालेगावचे सुपुत्र जवान सीमेवर तैनात असताना शहीद

नाशिक : प्रतिनिधी – मालेगाव तालुक्यातील माणके गावचे रहिवासी असलेले जवान मनोराज शिवाजी सोनवणे (३५) हे सीमेवर तैनात असताना शहीद झाले आहेत. याबाबतची माहिती मालेगाव तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे. सोनवणे हे २१ पॅराट्रूप स्पेशलमध्ये काम कार्यरत होते. ते  १६ वर्षांपासून भारतीय लष्कर सेवेत कार्यरत होते.Martyred
तहसील कार्यालयातर्फे प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, दहा दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशमधील देशाच्या सीमेवर तैनात असताना त्यांना बदलत्या वातावरण आणि अती उंच प्रदेशाचा त्रास जाणवला. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे दहा दिवसांपूर्वी त्यांना कोलकातामधील कमांड हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते. याठिकाणी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी जयश्री सोनवणे, मुलगा तुषार सोनवणे (६), मुलगी तनू सोनवणे (३) असा परिवार आहे.

श्रद्धांजली !

देशसेवेचे कर्तव्य बजावत असतांना नाशिक जिल्ह्यातील माणके- चिखलओहोळ ता.मालेगाव येथील रहिवासी असलेले वीर जवान मनोराज सोनवणे शहीद झाले.मनोराज सोनवणे हे सोळा वर्षांपासून भारतीय लष्करातील मराठा बटालियन मध्ये कार्यरत होते. २१ पॅराट्रप या स्पेशल फोर्स मध्ये भारताच्या सीमेवर अरुणाचल प्रदेशात अधिक उंचावर कर्तव्य बजावत असतांना त्यांची तब्येत खालावली. त्यानंतर त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या निधनाने देशाने वीर जवान गमावला आहे.मनोराज सोनवणे यांना राज्य सरकारच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.Martyred

छगन भुजबळ
मंत्री,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य.Martyred

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.