हुतात्मा मिलिंद खैरनार २६/११ च्या सर्च ऑपरेशन मध्ये होते सहभागी

नाशिक : काश्मीरमधील बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मिलिंद किशोर खैरनार (वय ३४) यांना वीरमरण आले. मूळचे नंदुरबार तालुक्यातील बोराळेचे सुपुत्र असलेले मिलिंद हे भारतीय वायुदलात सार्जंट गरुड कमांडो होते.

रिंकू असे मिलिंद यांचे टोपण नाव. त्यांचे वडील किशोर सदाशिव खैरनार हे वीज मंडळात ऑपरेटर. मिलिंद यांचे शिक्षणही या परिसरात सामान्यतः होणाऱ्या मुलांच्या शिक्षणाप्रमाणे झालेलं. दहीवेल (ता. साक्री) या खेडेगावात पहिली ते दुसरीपर्यंतचे शिक्षण, तिसरी ते पाचवीपर्यंतचे शिक्षण निजामपूर या मोठ्या खेड्यात, पाचवी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण साक्री या तालुक्याच्या ठिकाणी तर पदवीचे शिक्षण धुळे शहरात झाले. १६ डिसेंबर २००२ मध्ये मिलिंद खैरनार हे भारतीय सैन्यदलाच्या एअरफोर्समध्ये दाखल झाले होते.

२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी अनेक पर्यटकांना पाकड्या दहशतवाद्यांनी ओलीस बनवून ठेवले होते. सामान्य माणसांना ढाल बनवून त्यामागून कारवाया ते करत होते. अशावेळी हॉटेल ताजमध्ये राबविण्यात आलेल्या सर्च ऑपरेशन रक्बाविण्यात आले होते. या ऑपरेशनमध्ये मिलिंद खैरनार सहभागी होते. हल्ल्यावेळी हेलिकॉफटरने नरिमन हाऊसवर उतरलेल्या ३ कामांडोपैकी मिलिंद हे दुसरे कमांडो होते. मिलिंद यांनी आपल्या कारकिर्दीत दिल्ली, कलाईकोंडा (पश्चिम बंगाल), नडिया (गुजरात), चंदीगढ याठिकाणी एअरफोर्सचा गरुड कमांडर म्हणून सेवा बजावली आहे. भारतीय शांतीसेनेत त्यांनी वर्षभर सेवा बजावली होती.

मिलिंद यांचे वडील एमएसइबीमधून वरिष्ठ यंत्रचालक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर दिंडोरी रोड वरील गणेश प्लाझा या इमारतीत नाशिक येथे स्थायिक झाले आहेत तर भाऊ मनोज हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. बोराळे येथील वडिलोपार्जित घरामध्ये मिलिंद यांचे काका तुकाराम सदाशिव खैरनार हे कुटूंबासह राहतात. ते पोस्टमास्तर म्हणून सेवानिवृत्त आहेत.

मिलिंद यांची पत्नी हर्षदा (३०), मुलगी वेदिका (५), मुलगा कृष्णा (२) यांसह नियुक्तीच्या ठिकाणी राहत होते. गेली दोन महिने वडील आणि आई चंदीगड येथे असूनही मिलिंद यांची जम्मू काश्मीरमध्ये ड्युटी असल्यामुळे ते भेटू शकले नाही. गेल्या सोमवारीच मिलिंद यांचे वडील नाशिकच्या घरी परतले होते आणि आज त्यांना ही दुःखद बातमी दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले. यामुळे त्यांना धक्काच बसला आहे. त्यामुळे मिलिंद हे ८ एप्रिलला नाशिकमध्ये सुट्टीवर आले असता त्यांची आणि आई वडिलांशी शेवटची भेट ठरली.

martyred jawan sarjant garud cammando milind khairnar with family
वीरपुत्र शहीद मिलिद खैरनार आणि त्यांचा परिवार

मिलिंदची वार्ता कळताच नंदुरबार जिल्ह्यासह राज्यावर शोककळा पसरली आहे. याचवेळी त्यांच्या वीरत्वाचा अभिमानही व्यक्त केला जात आहे. मिलिंद खैरनार यांना सैन्य दलात १५ वर्षे पूर्ण झाली होती.

जवान तयार करण्यासाठी देशाचा वेळ आणि संपत्ती किती खर्च होते याचा विचार करुन सरकारने दहशतवाद्यांचा समूळ नायनाट करायला हवा अशी अपेक्षा किशोर खैरनार यांनी व्यक्त केली आहे. तर मिलिंद सारख्या विरपुत्राचा गर्व आहे अशी प्रतिक्रिया संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.