मराठा क्रांती मूक मोर्चा : उत्तर महाराष्ट्रातून मराठा बांधवांसाठीची मुंबईतील तयारी

एक मराठा लाख मराठा : उत्तर महाराष्ट्रातून मराठा बांधवांसाठीची मुंबईतील तयारी

नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार य जिल्ह्यातूनही मोर्चासाठी मुंबईत मराठा बांधव आपला सहभाग नोंदवणार  आहेत. यामध्ये नाशिककडून येणाऱ्या वाहनांसाठी शहापूर येथे महामार्गालगत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.   अहमदनगरकडून येणाऱ्या वाहनांसाठी मुरबाड येथे महामार्गालगत, कल्याणमध्ये बिर्ला कॉलेज मैदानात आणि डोंबिवलीत संत सावळाराम महाराज क्रीडा संकूल येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठाणे शहरात आनंदनगर जकात नाका येथील मैदानात मध्यवर्ती पार्किंग उभारण्यात आलं असून तिथे नाश्ता आणि मोबाईल टॉयलेटची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

मोर्चाचा मुंबईतील मार्ग आणि वाहतूक बदल

उत्तर महाराष्ट्रातून आल्यानंतर भायखळ्याला ट्रेनने जाण्यासाठी मध्य रेल्वेने प्रवास करावा लागणार आहे. कल्याण, ठाणे या स्थानाकातून मध्य रेल्वेने जाता येईल. भायखळा स्टेशनला उतरल्यानंतर जवळच वीर जिजामात उद्यान आहे.

मुंबईत 8 आरोग्य कक्ष. 10 महिला डॉक्टर, 10 पुरुष डॉक्टर.आझाद मैदानात पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, फिरती शौचालये, 10 महिलांसाठी, 10 पुरुषांसाठीफायर इंजिन्सची व्यवस्था.

मोर्चाचा मुंबईतील मार्ग आणि वाहतूक बदल

मोर्चा नियमनसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले रस्ते –

 • डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते जेजे फ्लायओव्हरपर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल.<
 • जे.जे. फ्लायओव्हरवरून दोन्ही बाजूनी येणारी-जाणाऱ्या मार्गिका सर्व प्रकारच्या वाहनांना बंद असतील.
 • कर्नाक बंदर ते कर्नाक ब्रिजकडे वाहतूक पूर्ण बंद.
 • पर्यायी मार्ग
 • किंग्ससर्कलवरुन पी.डिमेलो रोडकडे जाणारी वाहतूक सुरु.
 • दादर टीटीवरुन डावीकडे जाणारी वाहतूक सुरु.
 • नायगाव क्रॉसरोडवरुन डावीकडे आरएकेवरुन चार रस्त्याला वाहतूक सुरु.
 • मॅडम कामा रोडवरुन हुतात्मा चौककडे उजवीकडे वळण घेऊऩ काळाघोडा मार्गे ओल्ड कस्टम हाऊसची वाहतूक सुरु
 • एन.एम.जोशी मार्ग ते लोअर परेल स्टेशन ते वरळी नाका-हाजी अली, पेडर रोड वाहतूक सुरु.
 • मरिन ड्राईव्हवरुन हाजी अली, सी लिंक किंवा ई मोजेस रोडवर सिद्धीविनायक ते सेनाभवन वाहतूक सुरु.
 • मूक मोर्चाची आचारसंहिताहा मूक मोर्चा आहे.
  मोर्चात चालत असताना एकमेकांशी बोलणार नाही,घोषणा देणार नाही.
 • मी मोर्चाचे गांभीर्य राखणार.कोणी घोषणा दिल्या तर त्याला तिथेच रोखणार.
 • मोर्चात अधिकृत बॅनर शिवाय कोणतेही वैयक्तिक/संस्था संघटनांच्या नावाने बॅनर्स लावणार नाही.
 • माझा मोर्चा कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही.
 • मोर्चामध्ये मी कुठल्याही पक्षाचा किंवा संस्थेचा नसून फक्त मराठा म्हणून येणार.मोर्च्यांच्या दिवशी सकाळी ११:०० वा. कुटुंबासह दाखल होणार.
 • मोर्चात मी कोणतेही व्यसन करून सहभागी होणार नाही,कोणाला करूही देणार नाही.
 • महिला,लहान मुले व वृद्धांना सहकार्य करणार,माता,भगिनींना पुढे जाऊ देईन.
 • मला जिथे जागा मिळेल तिथूनच मी चालेल.
 • http://nashikonweb.com/important-notes-for-maratha-kranti-morcha-at-mumbai/
 • http://nashikonweb.com/major-demands-of-the-maratha-revolution-mumbai-morcha/
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.