शरद पवारांनी घटना दुरुस्ती मसुदा दयावा, मागासलेपणावर आरक्षण शक्य
नाशिक :मराठा आरक्षणावर सरकार अधिवेशन बोलावत असून, तो फार्स असणार आहे. सर्वात आगोदर आर एस एस आणि भाजपने आपली भूमिका काय ती स्पष्ट करावी एका कार्यक्रम द्यावा एक मसूदा प्रसिद्ध करावा, अधिवेशन जर झाले तर फक्त पॉप्यूलर घोषणा करणार असे दिसते आहे असे स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. नाशिक येथे दादा साहेब गायकवाड सभागृहात जिल्हा मेळाव्यासाठी ते आले होते.maratha reservation possible political party’s clear views Ambedkar
मराठा आरक्षणाविषयी प्रश्न लवकर सुटावा अशी स्पष्ट भूमिका कोणताही पक्ष घेतांना दिसत नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आरक्षणासाठी घटनेत दुरुस्ती करावी असे नवीन मत मांडले आहे. मात्र आगोदर ते आर्थिक निकषावर आरक्षणाची भूमिका घेत होते. फक्त सल्ला नको तर नेमका काय बदल असावा त्यांनी त्यासाठी घटना दुरुस्तीचा मसुदा सादर करावा. त्यामुळे अधिक स्पष्टता येईल आणि सर्वाना समजेल.maratha reservation possible political party’s clear views Ambedkar
सध्याचे राज्याचे सरकार गंभीर चर्चा , कार्यवाही याऐवजी पॉप्युलर घोषणा व गुंतागुंत वाढविण्यातच व्यस्त आहे धनगर समाजाला अनुसुचित जाती- जमातीचे आरक्षण देता येत नाही असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. त्यामुळे धनगर समाजाने आपली भूमिका व दिशा स्पष्ट करुन सत्ताधारी पक्षाबरोबर राहण्याऐवजी स्वतंत्र वाट चोखाळली. तसेच मराठा समाजालाही करता येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन आणि गोलमेज परिषदेत सामाजिक मागासलेपणावर आधारीत आरक्षण देण्याची भूमिका मांडली होती. त्या आधारेच मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य आहे. आजही राज्य घटनेनुसार आर्थिक निकषांच्या नव्हे तर सामाजिक मागासलेपणाच्या आधारेच आरक्षण शक्य आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाकडे सत्ता असली तरी राज्यातील 159 कुटुंब वगळता उर्वरीत समाज मागासलेलाच आहे असे आम्ही मानतो.maratha reservation possible political party’s clear views Ambedkar
आपल्या देशाचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समतेचे पाईक नाहीत. तर ते विषमतेला खतपाणी घालणारे नेते आहेत. याबरोबर कॉँग्रेस सरकारचा नाकर्तेपणा सोबतच भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याने लोकांनी त्यांना सत्तेवरून बाजूला केले होते. तर यांच्या विरोधातील पक्ष असलेल्या भाजपाला मतदान केले होते. या मतांमुळे मोदी देशाचे पंतप्रधान झाले आहेत.
या चार वर्षांत मोदी सरकार कॉँग्रेसपेक्षाही अधिक निष्क्रिय आणि जाती-धर्माचे विष कालवणारे सरकार आहे असे समोर आले. त्यामुळे येत्या स्वातंत्र्यदिनानंतर मोदींची लक्तरे वेशीवर टांगल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी राहणार नाही, असे परखड मत आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब जाहीर सभेत केले आहे.‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने रविवारी (दि.२९) भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात संवाद यात्रेअंतर्गत जिल्हा मेळाव्याचे आयोजन केले होते.maratha reservation possible political party’s clear views Ambedkar