आंबा प्रकरण : भिडे गुरुजींना 31 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश

माझ्या बागेतील आंबा खाल्याने मुलगा होतो अशा आशयाचे विधान केल्या प्रकरणी नाशिक महापालिकेने संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात खटला दाखल केला असून न्यायालयाने त्यांना 31 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश दिला आहे. शुक्रवारी (दि. १०) जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप पांडे यांनी हे आदेश दिले आहेत. Mango chapter Bhide Guruji court ordered presence 31st August Nashik

जुने नाशकात 2 महिन्यांपूर्वी जूनमध्ये झालेल्या एका सभेत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक भिडे गुरुजी यांनी ही आंबा थेअरी मांडली होती. त्यावरून राज्यभरात वातावरण तापले होते तर सोशल मीडिया वर हा मुद्दा चर्चेत राहिला होता. यावरून कोणी भिडेंची पाठराखण तर कोणी खिल्ली देखील उडवली.

याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध महापालिकेने खटला दाखल केला आहे. महापालिकेमार्फत ॲड. सुवर्णा शेफाल यांनी युक्तिवाद करत आहेत. मनपाच्या वकिलांनी प्रथम दर्शनी गुन्हा घडल्याचा युक्तिवाद केला असून न्या. जयदीप पांडे यांनी संभाजी भिडे यांना येत्या ३१ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. त्याबाबतची नोटीस देखील बजावली जाणार आहे. Mango chapter Bhide Guruji court ordered presence 31st August Nashik

दरम्यान, महापालिकेच्या चौकशी समितीसमोर अनुपस्थित राहणाऱ्या संभाजी भिडे यांना न्यायालयाच्या वतीने हजर राहण्याचे आदेश बजावला असून त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. यावेळी न्यायालयात भिडे उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Mango chapter Bhide Guruji court ordered presence 31st August Nashik
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.