प्रियकराने प्रेयसीला जिवंत जाळले

प्रेम आणि त्यातील भांडणे कोणत्या स्थराला जातील याचे सांगता येत नाही. मात्र रागाच्या भरात प्रेम असलेल्या व्यक्तीच्या जीवावर कोण कसे काय उठू शकते. असाच संतापजनक प्रकार आडगाव येथे घडला आहे. या परिसरात राहणाऱ्या प्रेयसीसोबतच्या वादातून रागाच्या भरात तिच्या अंगावर डिझेल ओतून तिला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. आडगाव शिवारातील दुशिंगे मळ्यात सोमवारी संध्याकाळी उशिरा घडला आहे.


या प्रकरणात प्रेयसी ९० टक्के भाजली असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. प्रेयसीला जिवंत पेटवणाऱ्या नराधम प्रियकरावर आडगाव पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
या युवतीचा भाऊ हा येवला तालुक्यातील खामगाव (पाटी) येथे रहिवासी असून त्याने आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार कोणार्कनगर येथे राहणाºया प्रवीण कृष्णा डोईफोडे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेतील ३२ वर्षीय पिडिता गंभीर भाजल्याने तिची प्रकृती चिंताजणक असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वृत्त असे की, कोणार्कनगर येथे राहणाऱ्या प्रवीण डोईफोडे व युवतीचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे तिचा प्रियकर हा पिडिता राहत असलेल्या दुशिंगे मळ्यात घरी नेहमी येत असे. घटना घडली त्या सोमवारी दि.९ सायंकाळी संशयित प्रवीण नेहमीप्रमाणे पिडितेच्या घरी आला होता. मात्र काही वेळाने कोणत्या तरी कारणाने दोघांत जोरदार वाद झाले. त्यातून संतापलेल्या प्रवीण याने प्रेयसीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतला त्यानंतर अंगावरचा ड्रेस फाडला व तो गॅसवर पेटवून तिच्यावर टाकून पेटवून दिला होता.

घटनेत प्रेयसी ९० टक्के भाजली , घटनेनंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.असून आडगाव पोलिसांनी संशयित प्रविण डोईफोडे याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.