Malegoan Election मतदान सुरु काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

मालेगाव (नाशिक) : महापालिकेसाठी मतदान सुरू असताना एटीटी हायस्कूल येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. यामध्ये  दोन कार्यकर्ते  किरकोळ जखमी झाखमी झाले आहेत. पोलिस घटनास्थळी असून स्थिती नियंत्रणात आहे.मालेगाव महापालिकेच्या ८३ जागांसाठी आज सकाळी ८ वाजता मतदानास  प्रारंभ झाला.  ३७४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, २१ प्रभागांतून ८४ नगरसेवक निवडून जाणार आहेत. काँग्रेसचा एक नगरसेवक बिनविरोध झाल्यामुळे ८३ जागांसाठी मतदान होत आहे. ५१६ मतदान केंद्रांवर तीन हजार ५०० कर्मचाºयांच्या मदतीने मतदान प्रक्रिया राबविली जात आहे.

पनवेल, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव या तिन्ही महापालिकांसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान सुरु राहिल. एकूण 252 जागांसाठी 1 हजार 251 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण 12 लाख 96 हजार 26 मतदारांसाठी 1 हजार 730 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

भिवंडी- निजामपूर, मालेगाव व पनवेल महानगरपालिका, धारणी पंचायत समिती, नागभीड नगर परिषद आणि नेवासा, रेणापूर व शिराळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध ७ नगर परिषदांतील ११ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी बुधवारी मतदान होत आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. सर्व ठिकाणी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान होईल. २६ मे रोजी मतमोजणी होईल. तिन्ही महापालिकेच्या एकूण २५२ जागांसाठी १ हजार २५१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण १२ लाख ९६ हजार ०२६ मतदारांसाठी १ हजार ७३० मतदान केंद्रांची व्यवस्था आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.