मालेगाव बाजार समितीत राडा   : शेतकऱ्याला मारहाण, लिलाव पाडले बंद

नाशिक : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टरबूज विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याला हमालाकडून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या कारणाने शेतकऱ्यांकडून निलाव बंद करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी सर्व शेतकरी वर्गाने घेतली आहे. तो बाजार समिती मध्ये रोज होत असेलल्या छोट्या छोट्या चोऱ्यांना शेतकरी वैतागले आहेत.

मालेगाव बाजार समितीत आलेल्या शेतकऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी शेतकऱ्यांनी आज मार्केट निलाव बंद केला आहे.आज सकाळी जेव्हा मार्केट सुरु झाले तेव्हा टरबूज विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्या कडून टरबूज उतरवण्यासाठी असलेल्या मार्केटच्या हामालाने शेतकऱ्याचे फळ मागून घेणे नियमित घडते. मात्र जेव्हा आज हमालाने  2 टरबूज घेवून पुन्हा विना पैसे अधिक  फळाची मागिनी केली तेव्हा शेतकरयाने त्यास नकार दिला. त्यामुळे अजून टरबूज दिले नाहीत म्हणून हमालाने शेतकऱ्यास शिवीगाळ व मारहाण केली आहे.

अश्या प्रकारे फुकट फळ चोरीचा प्रकार कायमच होत असतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर हामालांना जर कुणी विरोध केला तर  गुंड प्रवृत्तीचे लोक आणून शेतकऱ्यांना दमबाजी करणायत येते. या सर्व त्रासाला कंटाळून आज म्हणूच शेतकरी आज आक्रमक झालेले दिसले. शेतकऱ्यास मारहाण केली त्याला  जो पर्यंत अटक होत नाही तो पर्यंत मार्केट निलाव होऊ देणार नाहीत.यावर शेतकरी ठाम आहेत.त्यामुळे आता मार्केट कमिटीला यामध्ये कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.