मालेगाव दोन्ही कॉंग्रेसला यश तर भाजपा मुस्लीम कार्ड फेल (नगरसेवक यादी)

मालेगाव महापालिका निवडणूक त्यातल्या त्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला थोडी चांगली गेली आहे असे म्हणता येणार आहे. दोनही कॉंग्रेस ने याठिकाणी चांगल्या जागा जिंकल्या आहेत. मात्र भाजपाने जे मुस्लीम कार्ड चालवून यश मिळवू असे ठरविले होते ते सफशेल  फोल ठरले असून काही जागांवर भाजपाला समाधान मानावे लागेल असे चित्र आहे.त्यामुळे अल्पसंख्यांक समाजात भाजपा विरोधी लाट सुरु झाली आहे असे म्हणावे लागेल.

मालेगाव येथे आपली सत्ता यावी आणि मुस्लीम समाजात आपली प्रतिमा कशी आहे,किती मत मिळतात असे पाहणी भाजपला करायची होती. तर मुस्लीम भागात मुस्लीम उमेदवार दिला तर काय फरक पडतो याकडे ही भाजपला चाचपणी करायची होती. मात्र निलावरून तरी आकडे असे कोणताही संकेत देत नाहीत की भाजपाचे मुस्लीम कार्ड चालले आहे. उलट पक्षी दादा भुसे यांनी आपले सर्व उमेदवार निवडणू आणले असून सत्ता बनविताना जर दोनही कॉंग्रेस एकत्र आल्या नाहीत तर शिवसेना निर्णायक ठरणार आहे.हिंदूबहुसंख्य असलेल्या  मतदार असणाऱ्या पश्चिम मालेगावमध्ये शिवसेनेला यश मिळाले आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्व प्रस्थापित उमेदवारांना नाकारून नवीन चेहऱ्यांनी संधी दिली होती.

आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष असून भाजपचे नऊ जागांचे यश हे त्यामध्ये मोठे आहे.

मालेगाव महापालिका निवडणूकीचे सर्व ८४ निकाल लागले आहेत. त्यामध्ये  काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे २८ जागा मिळाल्या आहेत, तर २० जागा घेऊन राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर आहे. शिवसेनेला १३ जागा मिळाल्या असून भाजपाचे ९ जागा मिळवले आहे. तरएम आयएमने पक्षाचे ७ उमेदवार जनता दलाला ६ जागा मिळाल्या आहेत. एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तिसरा महाज यांची आघाडी होती त्यामध्ये  संख्या  बल २६ पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी स्थिती निर्माण झाली आहे. सत्ता स्थापने साठी ४३ संख्याबळ लागणार आहे.

मालेगाव महापालिका  : 84 जागा

मॅजिक फिगर : 43

पक्ष                                                जागा

काँग्रेस                                                28
राष्ट्रवादी (20)+जनता दल (6)           26
शिवसेना                                            13
भाजप                                                09
एमआयएम                                        07
इतर                                                  01

 

मालेगाव महापालिका विजयी उमेदवार

वॉर्ड क्र. 1

कविता बच्छाव, शिवसेना

जिजाबाई पवार, शिवसेना

प्रतिभा पवार, शिवसेना

विजय देवरे, भाजप

 

वॉर्ड क्र. 2

विठ्ठल बर्वे, काँग्रेस

छाया शिंदे, भाजप

हमिदाबी शे. जब्बार, काँग्रेस

नारायण शिंदे, शिवसेना

 

वॉर्ड क्र. 3

अन्सारी मन्सूर अह. शब्बीर अह, अपक्ष

जाकिया बी नजरुद्दीन, राष्ट्रवादी

मोमिन सायरा बानू शाहिद अहमद, राष्ट्रवादी

शेख जाहिद शेख जाकीर, राष्ट्रवादी

 

वॉर्ड क्र. 4

मंगलाबाई भामरे, काँग्रेस

रजिया बेगम अब्दुल मजिद, काँग्रेस

नंदकुमार सावंत, काँग्रेस

अब्दुल अजिज अब्दुल सत्तार, काँग्रेस

 

वॉर्ड क्र. 5

नजीर अहमद इरशाद, काँग्रेस

जैबुन्सी नुरुल्लान नुरुल्ला, काँग्रेस

मो. कमरुन्नीसा रिजवान, काँग्रेस

फकीर मोह. शेख सादिक, काँग्रेस

 

वॉर्ड क्र. 6

अन्सारी तन्वीर मोह. जुल्फीकर, जनता दल (सेक्युलर)

सय्यद शबानाबानो सय्यद अकील, जनता दल (सेक्युलर)

अन्सारी साजेदा बानो मोह. याकूब, जनता दल (सेक्युलर)

अ. बाकी मोह. ईस्माईल, जनता दल (सेक्युलर)

 

वॉर्ड क्र. 7

शबाना शेख सलीम, काँग्रेस

शे. राजीयाबी शे. इस्माईल, काँग्रेस

निहाल अह. मोह. सुलेमान, काँग्रेस

सलीम अन्वर, काँग्रेस

 

वॉर्ड क्र. 8

पुष्पा गंगावणे, शिवसेना

दीपाली घारुळे, भाजप

सखाराम घोडके, शिवसेना

राजाराम जाधव, शिवसेना

 

वॉर्ड क्र. 9

तुळसाबाई साबणे, भाजप

संजय काळे, भाजप

ज्योती भोसले, शिवसेना

सुनील गायकवाड, भाजप

 

वॉर्ड क्र. 10

आशा अहिरे, शिवसेना

जिजाबाई बच्छाव, शिवसेना

जयप्रकाश पाटील, शिवसेना

निलेश आहेर, शिवसेना

 

वॉर्ड क्र. 11

भारत बागुल, भाजप

कल्पना वाघ, शिवसेना

सुवर्णा शेलार, भाजप

मदन गायकवाड, भाजप

 

वॉर्ड क्र. 12

शेख कलीम दिलावर, राष्ट्रवादी

अन्सारी आसफा मो. राशिद, राष्ट्रवादी

अन्सारी साजेदा रशिद, राष्ट्रवादी

बुलंद इक्बाल निहाल अहमद, जनता दल (सेक्युलर)

 

वॉर्ड क्र. 13

जफर अह. अहमदुल्ला, काँग्रेस

नूरजहाँ मो. मुस्तफा, काँग्रेस

सलीमा बी सय्यद सलीम, काँग्रेस

फारुख खान फैजुल्लाह खान, काँग्रेस

 

वॉर्ड क्र. 14

जैबुन्निसा शमसुद्दोहा, राष्ट्रवादी

अफसरुन्निसा मोह. आरीफ सलोटी, राष्ट्रवादी

नाबी अह. अहमदुल्ला, राष्ट्रवादी

अन्सारी अमानतुल्ला पीर मोहम्मद, राष्ट्रवादी

 

वॉर्ड क्र. 15

शाने हिंद निहाल अहमद, जनता दल (सेक्युलर)

अन्सारी सबिहा मोहम्मद मुजम्मील, राष्ट्रवादी

मोहम्मद सुहान मोहम्मद अय्युब, राष्ट्रवादी

अन्सारी अतिक अह. कमाल अह, राष्ट्रवादी

 

वॉर्ड क्र. 16

यास्मिन बानो एजाज बेग, राष्ट्रवादी

शेख नसरीन अल्ताफ, राष्ट्रवादी

एजाज बेग अजीज बेग, राष्ट्रवादी

अन्सारी अबाज अह. मो. सुलतान, राष्ट्रवादी

वॉर्ड क्र. 17

अन्सारी शफीफ अह. निसार अह, राष्ट्रवादी

सादीया लईक हाजी, एमआयएम

अन्सारी अख्तरुन्निसा मो. सादीक, राष्ट्रवादी

अन्सारी मो. साजिद अ. रशीद, राष्ट्रवादी

वॉर्ड क्र. 18

माजिद हाजी, एमआयएम

शेख कुलसुम बी शे. रफिक, एमआयएम

हमिदाबी साहेब अली, काँग्रेस

इस्माईल खा इस्माईल, काँग्रेस

वॉर्ड क्र. 19

मोहम्मद अस्लम खालील अह, काँग्रेस

रेहाना बानो ताजुद्दीन, काँग्रेस

किशवरी अशरफ कुरेश, काँग्रेस (बिनविरोध)

शेख नईम शेख इब्राहिम, काँग्रेस

वॉर्ड क्र. 20

मोह. सुलतान मोह. हारुन, काँग्रेस

शेख ताहेरा शेख रशीद, काँग्रेस

रशिदाबी अ. मनबान, काँग्रेस

शेख रशिद शेख शफी, काँग्रेस

वॉर्ड क्र. 20

शेख मोहम्मद युनुस शेख ईसा, एमआयएम

मोमीन रजिया शाहीद अहमद, एमआयएम

शेख रहिमाबी शेख इस्माईल, एमआयएम

शेख खालिद परवेज मो. युनुस, एमआयएम

www.nashikonweb.com

प्रसिद्धी पत्रक,निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा  तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com

Twitter       :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook   :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.