मालेगावचा कांदा व्यापारी बांगलादेशमध्ये बेपत्ता? कोट्यावधी रुपये अडकले

शेतकरी वर्गाचे कोट्यावधी रुपये अडकले

नाशिक : मागील दोन महिन्यात कांदा खरेदी करत बांगलादेश येथील व्यापाऱ्याला विकत, ते पैसे न आल्याने स्वतः बांगलादेश येथे मालेगावचा व्यापारी वसुलीसाठी गेला असून, तो तेव्हापासून बेपत्ता आहे.बांग्लादेशात पैसे घेण्यासाठी गेलेला मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील व्यापारी शिवाजी सुर्यवंशी हे गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता आहे. त्यामुळे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने संबंधित व्यापारी, जामीनदार प्रल्हाद अग्रवाल या दोघांच्याही मालमत्तेचा लिलाव करून शेतक-यांचे पैसे अदा करण्याची अनुमती मिळविण्यासाठी बाजार समितीने जिल्हाधिका-यांना विनंती अर्ज केला आहे. Malegaon onion merchant missing Bangladesh Crores onion purchases stuck

नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील कार्यरत व्यापा-यांनी शेतक-यांचे सुमारे २९ कोटी रूपये थकविले आहे. संदर्भातील तक्रारींची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समित्यांना संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या नोटीसा आधीच दिल्या आहेत.त्यामुळे बाजार समित्यांच्या संचालकांचे धाबेदणाणले आहेत.

तर काही बाजार समित्यांनी यापुढे फक्त रोखीनेच व्यवहार करण्याची सक्ती व्यापा-यांना करण्यात आली आहे.मालेगाव तालुक्यातील शिवाजी सुर्यवंशी यांनी डिसेंबर २०१७ व जानेवारी २०१८ या काळात तालुक्यातील शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी केला होता. या कांद्याचे  बाजारातील मूल्य साडेतीन कोटी रूपये आहे. सुर्यवंशी यांनी बांगलादेशातील व्यापा-याला सदरचा कांदा निर्यात केला होता. मात्र त्या व्यापाऱ्यांकडून पैसे मिळत नसल्याने ते पैसे घेण्यासाठी बांगलादेशला गेले आहेत. मात्र त्यांचा अद्याप कोणताही पत्ता नाही. Malegaon onion merchant missing Bangladesh Crores onion purchases stuck

त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती स्पष्ट केले आहे. तर शेतक-यांना चार महिन्यांपासून पैसे न मिळाल्यामुळे बाजार समितीने अडत्याकडून एक कोटी रूपये वसुल करून शेतक-यांना वाटप केले होते. मात्र उर्वरित अन्य शेतक-यांना पैसे मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करण्याची भिती बाजार समितीला वाटत आहे.

तर व्यापारी सुर्यवंशी यांनी बाजार समितीकडून परवाना घेत असताना त्यांच्या मालकिची मुंगसे शिवारातील शेतजमीन तारण म्हणून बाजार समिती कडे ठेवली आहे. त्यांचे जामीनदार उमराण्याचे प्रल्हाद ताराचंद अग्रवाल यांनी आडत्याची आर्थिक जबाबदारी स्विकारली असून त्यांनी उमराणे येथील बंगला तारण ठेवला आहे. Malegaon onion merchant missing Bangladesh Crores onion purchases stuck

या दोन्ही मालमत्तांवर बाजार समितीचे नावे लावण्यासाठी बाजार समितीने संबंधित तहसिलदारांशी पत्रव्यवहार केला  असून, फक्त मालमत्तेवर बोजा चढवून शेतक-यांची रक्कम वसुल होणार नसल्याचे पाहून बाजार समितीने शिवाजी सुर्यवंशी व जामीनदार प्रल्हाद अग्रवाल या दोघांच्या मालमत्ता लिलाव करून मिळावी अशी मागणी जिल्हाधिका-यांकडे पत्र पाठवले. बाजार समितीचे सभापती सुनील देवरे व सचिवांनी या संदर्भातजिल्हाधिकारी यांनी भेट घेतली आहे.

Malegaon onion merchant missing Bangladesh Crores onion purchases stuck

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.