मालेगाव : पुन्हा शेतकरी आत्महत्या ; एकूण आकडेवारी चिंताजनक !

                                नाशिक : शेतकरी वर्गामागे सुरु असलेले शुक्ल काष्ट काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. तर सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा खरच फायदा होतोय का ? हे सुद्धा तपासावे लागणार आहे.मालेगाव येथील एका तरुण शेतकऱ्याने आपली जीवन यात्रा संपवली आहे. सोमवारी सकाळी हा सर्व प्रकार उघड झाला आहे.  कळवाडी येथील  शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या शेतात गळफास घेवून आत्महत्या केली .अनिल अशोक देसले (वय ४० ) असे या शेतक-याचे नाव आहे .

सोमवारी सकाळी शेतात दुध काढण्यासाठी गावातील व्यक्ती गेली असता शेतातील गोठ्यनजीक त्यांनी गळफास घेतल्याचे समोर आले . त्यांच्या नावे २ ते ३ एकर जमीन असून बँक ऑफ महाराष्ट्रचे साडेतीन ते चार लाखाचे कर्ज असल्याचे नातेवाईकांनी सांगितले . कर्जबाजारीपणा , पिकला भाव नाही व सततची नापिकी यामुळे नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते आहे. त्यांच्या पश्चात आई , पत्नी , दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे .

नाशिक जानेवारी २०१७ ते जूनचा पहिला आठवडा या कालावधीत नाशिक जिल्ह्यात ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला आहे. तर  नांदगाव तालुक्यात गेल्या सव्वापाच महिन्यांत नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मालेगाव तालुक्यात सात शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात झाली आहे.

निफाड तालुक्यात तालुक्यात सहा आत्महत्या झाल्या असून, त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. सुरगाण्या तालुक्यातही वर्षांत पहिल्यांदाच शेतकरी आत्महत्येची घटना घडली आहे. सव्वापाच महिन्यांत सर्वाधिक १६ आत्महत्यांच्या घटना मे महिन्यात घडल्या आहे.आमुळे ही आकडेवारी नक्कीच विचार करयला लावणारी आहे.

चिंताजनक आकडेवारी !

 नाशिक, अहमदनगर, जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत तब्बल ४७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.या विभागातील नाशिक, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ४७६  शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यात १६९, अहमदनगरमध्ये १३६ तर जळगावमध्ये १७१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कृषी सधन भागात या आत्महत्या मोठया प्रमाणावर घडत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

यातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे पंचवीशीतील युवकांची यात संख्या अधिक असल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या पातळीवर केला जात आहे; पण हे प्रयत्न अपुरे पडतात की काय, असा प्रश्न आहे. सध्या तरी प्रशासन केवळ मदतीपूरतेच काम करत असल्याचे दिसून येते.

दुष्काळी फेरा, नापिकी, कर्ज, मुलांचे शिक्षण, लग्न यामुळे ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा कणाच मोडला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाय योजना राबवल्या जात असताना आत्महत्यांचा आकडा उत्तरोत्तर वाढत चालला आहे. वर्षभरात देशातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. तर देशात शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरयांनी आपली जीवनयात्रा संपवली असून त्यापाठोपाठ तेलंगणाचा क्रमांक येतो.

राज्यात नाशिक जिल्हयाचा विचार करता उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या या नाशिक जिल्हयात घडत असल्याचे दिसून येते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.