Malegaon Corona SRPF मालेगावात बंदोबस्तात वाढ : एसआरपीएफच्या 4 तुकड्या दाखल


नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये : डॉ. पंकज आशिया
प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिस बंदोबस्तात वाढ; बँक राहणार 4 दिवस बंद

मालेगाव शहराच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंडसंहिता प्रक्रिया कलम 144 (1)(3) अन्वये कोणत्याही व्यक्तीला रस्त्यांवर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यांवर, गल्लीत संचार करणे, वाहतूक करणे, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्यास मनाई करण्यात आली असतांनाही शहरातील मध्यवर्ती भागात काही नागरिकांचा अजुनही संचार दिसून येत आहे. अशा नागरिकांना दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी विनाकारण घराबाहे पडू नये असे आवाहन घटना व्यवस्थापक तथा इमर्जन्सी ऑपरेश सेंटरचे प्रमुख डॉ. पंकज आशिया यांनी कळविले आहे. Malegaon Corona SRPF

प्रतिबंधात्मक कारवाईसाठी शहरात 502 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले असून राज्य राखील पोलिस दलाच्या 4 तुकड्या दाखल झाल्या आहेत. तसेच जळगाव येथून 100 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक शहरातील कायदा व सुव्यवस्थेसाठी तैनात करण्यात आली आहे.

मालेगाव शहरात कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट तयार होऊ नये यासाठी शासनाने विशेष दखल घेत मोठा फौजफाटा मालेगाव शहरात पाठविला असून दंडात्मक कारवाई टाळण्यासह आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे कळविले आहे.

मालेगावात बँका चार दिवस पूर्णपणे बंद राहणार असून भाजीपाला व किराणा घेण्यासाठीही काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. Malegaon Corona SRPF

दरम्यान, जमावबंदीच्या अनुषंगाने कालपर्यंत 187 गुन्ह्यांची नोंद झाली असून आज 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच कालपर्यंत 254 वाहनांकडून 47 हजार तर आज 58 वाहनांकडून 11 हजार असा एकूण 58 हजाराचा दंड वसुल करण्यात आला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.