मालेगाव बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे राजेंद्र जाधव

भाजपचा गट फोडण्यात शिवसेनेला यश

मालेगाव – संपूर्ण कसमादेचे लक्ष लागून राहिलेल्या मालेगाव बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक आज ( दि. १८) पार पडली. भाजपच्या तुलनेत एक सदस्य कमी असतानाही शिवसेनेचे राजेंद्र जाधव यांची निवड झाली आहे.

आपल्याच एका सदस्याने ऐनवेळी शिवसेनेच्या गोटात प्रवेश केल्यामुळे भाजपचा सभापती होऊ शकला नाही.

मालेगाव बाजार समितीत एकूण १८ संचालक असून भाजपचे ९ , शिवसेनेचे ८ तर काँग्रेसचा एक सदस्य असे बलाबल आहे.

अविश्वास ठरावाच्यावेळी काँग्रेसचे सभापती प्रसाद हिरेंच्या विरोधात शिवसेना भाजपचे संचालक एकत्र आले होते. यानंतर एक-एक वर्ष सभापती पद असे सूत्र ठरले. मात्र भाजकडून शब्द पळाला जात नाही असे चित्र असताना शिवसेनेने ऐनवेळी भाजपा सदस्य राजेंद्र जाधव यांना आपल्या गोटात घेऊन सभापती पद बहाल केले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.