सुंदरतेचा अट्टाहास मेकअप टिकत नाही म्हणून नव विवाहितेची आत्महत्या

शहरात धक्कदायक प्रकार घडला आहे. मेकअप करून सुंदर दिसत नाही आणि मेकअप टिकत नाही या कारणावरून नवविवाहीतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार अंबड परिसरात घडला असून पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पोलिसांना सुसाईड नोट देखील मिळाली आहे. suicide

आणखी एक दुर्दैवी घटना : १५ लाखाचे सोने चोरणाऱ्या मुलाच्या बापाची आत्महत्या

सविस्तर वृत्त असे की,आत्महत्या करणारी महिला नवविवाहित असल्याची माहिती मिळते आहे. दत्तनगर परिसरात माऊली चौक येथे रुखमा भास्कर खरचाण ( वय २७ ) ही नवविवाहिता राहत होती. बुधवारी सकाळी ८.३० वाजता पती कंपनीत कामावर गेल्यावर घरी कोणीच नसताना रुखमाने बाथरुममध्ये नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. रुखमाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. पोलिसांना ही चिठ्ठी मिळाली आहे. ‘माझ्या डोळ्यातुन पाणी येत असल्याने काजळ डोळ्यात लावता येत नव्हते व सुंदर दिसत नसल्याने आत्महत्या करत आहे’, असे तिने चिठ्ठीत लिहिले होते. अंबड पोलिसांनी घटनेची नोंद केली असून इतर काही कारण आहे का ? याची कसून तपासणी पोलीस करत आहेत.

suicide
Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “सुंदरतेचा अट्टाहास मेकअप टिकत नाही म्हणून नव विवाहितेची आत्महत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.