लासलगांव मध्ये महावीर जयंती उत्साहात साजरी

लासलगाव (वार्ताहर समीर पठाण) : अहिंसेचे पुजारी, पंचशील गुणांची शिकवण देणारे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची  जयंती लासलगांव शहरात विविध धार्मिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. Mahaveer jayanti celebration lasalgaon news nashik

यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेने लासलगांव करांचे लक्ष वेधले. सकल जैन समाजाच्या वतीने एकत्र येऊन  भगवान महावीरांची जयंती भक्तीभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. भव्य मिरवणुकी नंतर अरविंद मेहता यांचे प्रवचन झाले.

यावेळी नाशिकचे जिल्हा प्रधान न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, निफाडचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस सी मगरे, जिल्हा सत्र न्यायाधीश ए जी मोहबे , जिल्हा  व सत्र  न्यायाधीश  पी. डी. दिग्रसकर, नाशिक येथील प्रमुख  न्यायदंडाधिकारी  सुधीर बुक्के, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश आर आर हस्तेकर, न्या. आर एम सातव, न्या एस बी काळे, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम एस कोचर, न्या एस के दुगांवकर आणि अड जी. एन. शिंदे अध्यक्ष निफाड वकील संघ  यांचा सकल जैन समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी  सर्वे. नंबर  93  मधुन भव्य शोभायात्रेची सुरवात बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर,जि प सदस्य डि. के. जगताप, प. स. सदस्य शिवा सुरासे यांच्या हस्ते  सुरवात करण्यात आली. यात सर्व धर्म समभावचा आकर्षक रथ करण्यात आला. तसेच भगवान महावीर  यांची भूमिका आयुष ब्रम्हेचा यांनी  साकारली होती.

अहिंसा परमोधर्म की जय, वंदे विरम भगवान महावीर स्वामी की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जैन बांधव, आबालवृध्दांसह महिला या शोभायात्रेत मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी महावीर जयंती निमित्ताने 37 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

याप्रसंगी  रतनलाल राका, नितिन जैन, डॉ. विजय बागरेचा, डॉ प्रविण डुंगरवाल, प्रवीण ताथेड, प्रकाश दायमा, संतोष पलोड, मदनलाल बाफना, ओमप्रकाश राका, भगवान महावीर जन्मकल्याणक उत्सव समिती अध्यक्ष प्रीतेश आबड, सचिन दगड़े, मनोज मुथा, मनोज रेदासनी, नितिन नाहाटा, महावीर चोपड़ा, विजय भंडारी, प्रमोद जांगड़ा, मनोज शिंगी, निलेश पटनी, संतोष ब्रम्हेचा,सुरेशचंद्र नाहाटा, महावीर नाहाटा, तुषार साबद्रा, राजू कांकरिया, गोटू फुलपगार, फकीर बोथरा, अजित चोरडिया, प्रमोद बाकलीवाल, जितेन्द्र जैन, अभय जांगड़ा, सुरेश दगडे, संजय दुग्गड, विनोद ताथेड, सुनील आबड, पंकज आब्बड, दर्शन साबद्रा, ऋषभ भंडारी, अजित धाडीवाल,निलेश ब्रम्हेचा, राहुल बरडिया, जितेंद्र दगडे, राजू दगडे, सुरज आबड, स्वप्नील डुंगरवाल, सौरभ जैन, राजू देसरडा, महावीर दगड़े, आनद आबड, पंकज कांकरिया, शीतल साबद्रा यासह आदी सकल जैन बांधवा व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahaveer jayanti celebration lasalgaon news nashik
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.