अमेरिकेत मराठी झेंडा : नाशिककर सह्याद्री टीमने पूर्ण केली सांघिक ‘रॅम’

नाशिक : रॅम या अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्रातील सायकलीस्टने विजयी पताका लावल्या आहेत. नाशिकच्या टीम सह्याद्रीने केवळ ८ दिवस १० तास आणि १६ मिनिटात ही रेस पूर्ण केली आहे. सांघिक गटात (टीम ऑफ ४) मध्ये नाशिकच्या डॉ. राजेंद्र नेहेते (५०) , डॉ. रमाकांत पाटील (५३), युरोप मध्ये काम करत असलेले नाशिककर डॉ. संदीप शेवाळे (४६) आणि मुंबईचे पंकज मार्लेशा (३६) यांचा समावेश असलेली टीमने नवव्या क्रमांकावर रॅम रेस पूर्ण केली.

maharashtras team sahyadri shines in raam 2017 completed event 8 days 10 hours 45 mins-3 doctors

तत्पूर्वी नाशिकचे कर्नल डॉ. श्रीनिवास गोकुळनाथ यांनी वैयक्तिक (सोलो) गटात काल ११ दिवस १८ तास ४५ मिनिटात ही रेस पूर्ण केली आहे. ते आपल्या गटात सातव्या क्रमांकावर राहिले. तर नागपूरचे अमित समर्थ (सोलो गटात) यांनी ११ दिवस १८ तास ११ मिनिटात रेस पूर्ण केली. ते नवव्या क्रमांकावर राहिले.

फिनिश लाईन जवळ नाशिकचे कर्नल डॉ. श्रीनिवास गोकुलनाथ
amit saamrth in raam raceacross america from nagpur
अमित समर्थ – नागपूर

२०१५ सालच्या रॅम स्पर्धेच्या पर्वात डॉ. महाजन बंधूनी यश मिळवल्यानंतर भारतातील खास करून महाराष्ट्रातील आणि त्यात नाशिकच्या सायकलीस्ट मध्ये वेगळाच हुरूप आलेला दिसून येत आहे. रॅम २०१७ च्या पर्वात भारताला अभूतपूर्व यश मिळवून देण्यात नाशिकच्या सायकलीस्टचा मोठा वाट दिसून येत आहेत. रॅम २०१७ मधेय यश मिळवलेले सर्व ८ सायकलीस्ट महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. आणि विशेष म्हणजे या ८ पैकी ७ सायकलपटू हे डॉक्टर आहेत.

२०१५ साली डॉ. महाजन बंधूनी टीम ऑफ २ गटात रॅम स्पर्धा केवळ ८ दिवस १४ तास ५५ मिनिटात स्पर्धा पूर्ण करत रॅम स्पर्धा पूर्ण करणारे पहिले भारतीय ठरले होते. त्यांना सायकलिंगमध्ये यश मिळविण्यास नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनचे महत्वाचे सहकार्य मिळाले आहे.

त्यामुळे आता नाशिकला भारताची अधिकृत सायकलिंग कॅपिटल जाहीर करावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे नक्कीच.

maharashtras team sahyadri shines in raam 2017 completed event 8 days 10 hours 45 mins-3 doctors

result team sahyadri in raam race across america 2017

काय आहे रॅम स्पर्धा?

‘रेस अक्रॉस अमेरिका’ स्पर्धेत ४८०० हे अंतर एकाच टप्प्यात सलग १२ दिवसांमध्ये पार करताना संपूर्ण अमेरिका खंड पालथा घालायचा असल्याने ही जगातील आणि इतिहासातील सर्वात कठीण सायकल स्पर्धा मानली जाते. स्पर्धेच्या पात्रतेसाठी भारतात तीन स्पर्धा आहेत. डेझर्ट ५००, डेक्कन क्लीफ हँगर आणि बंगळुरू ते उटी.

या स्पर्धामध्ये तुम्हाला ३२ ते ३३ तासांमध्ये स्पध्रेच्या सर्व नियमांचं पालन करत ६०० किलोमीटर अंतर पार करायचे असते. दरम्यान, एकदा का तुम्ही पात्र ठरलात तर तुमची ती पात्रता स्पध्रेच्या पुढील तीन वर्षांसाठी ग्राह्य़ मानली जाते.

‘रेस अक्रॉस अमेरिका’ ही अल्ट्रा मॅरेथॉन सायकल स्पर्धा १९८२ साली जॉन मारिनो यांनी ‘ग्रेट अमेरिका बाइक रेस’ या नावाने सुरू केली. त्यामध्ये स्वत: जॉन मारिनो, जॉन हार्वड, मायकल शेरमर आणि लॉन हल्डमॅन हे चार स्पर्धक सहभागी झाले होते. ती स्पर्धा कॅलिफोíनयातील सॅटा मोनिका येथे सुरू होऊन न्यूयॉर्क शहरातील एम्पायर स्टेट बििल्डग येथे संपली होती.

लॉन हेल्डमॅन हा त्या स्पध्रेचा विजेता ठरला होता. त्याने ती स्पर्धा ९ दिवस ३ तास आणि २ मिनिटे या वेळेत पूर्ण केली होती. पहिल्याच वर्षांनंतर स्पध्रेचे नाव ‘रेस अक्रॉस अमेरिका’ असे बदलण्यात आले आणि स्पध्रेकरिता सायकलपटूंना आमंत्रण देण्याऐवजी पात्र ठरण्याची अट घालण्यात आली. २००६ साली स्पध्रेमध्ये मोठे बदल करण्यात आले.

मुख्य म्हणजे सोलो रायडरसाठी त्याच्या संपूर्ण प्रवासात ४० तासांचा कालावधी हा आरामासाठी देण्यात आला, जो वेळ एकूण स्पध्रेच्या वेळेत गणला जात नाही. आज घडीला ही स्पर्धा २३ वेगवेगळ्या गटांसाठी घेतली जाते. यामध्ये सोलो सायिलगपासून सांघिक शर्यतींचा समावेश असतो. ‘टूर डी फ्रान्स’ प्रमाणे या स्पध्रेमध्ये कोणतेही टप्पे नसतात.

स्पर्धा सुरुवात ते शेवट अशीच पार पडते. सर्वात वेगाने स्पर्धा पूर्ण करणारा स्पर्धक विजेता ठरतो. सर्वोत्तम सायकलस्वाराला ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी साधारणपणे एक आठवडय़ाचा कालावधी पुरतो.

रेस अक्रॉस अमेरिका ही सायकल शर्यत जगातील सगळ्यात अवघड सायकल शर्यत समजली जाते. आजवरच्या इतिहासात अवघ्या २०० जणांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. त्यात आता भारतीयांची संख्या वाढतच असलेली दिसून येत आहे.

raam team sahyadri race across america with tricolour indian flag tiranga

raam team sahyadri race across america

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.