महाराष्ट्र राज्य कबड्डी दिनाचे पुरस्कार जाहीर

दौलतराव शिंदे, रामचंद्र बोडके यांना कृतज्ञता पुरस्कार

विकास काळे व कोमल देवकर यांना सर्वात उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान

नाशिक : १७ व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी दिनाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून या वेळी कृतज्ञता पुरस्काराने नाशिक चे जेष्ठ क्रीडा संघटक व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते दौलतराव शिंदे व सांगलीचे रामचंद्र बोडके यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तर राज्यातील सर्वात उत्कृष्ट खेळाडूचा बहुमानाचा मानकरी पुणे जिल्ह्याचा विकास काळे व मुंबई उपनगरची कोमल देवकर यांनी पटकाविला.

Maharashtra State Kabaddi Day

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या वतीने कबड्डी महर्षी शंकरराव तथा बुवा साळवी यांच्या जन्मदिवसानिमित्त गेल्या १६ वर्षापासून साजरा करीत आहे. या वर्षीच्या पुरस्कार सोहोळ्याचे आयोजनाचा बहुमान नाशिक जिल्हा कबड्डी असोहिएशनला मिळाला आहे. नाशिक येथील हॉटेल एमरल्ड पार्क येथे शनिवार दिनांक १५ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता कबड्डी दिन पुरस्कार सोहळ्याने साजरा करण्यात येणार आहे.

पुरस्कारांची घोषणा राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत केली. यावेळी राज्य संघटनेचे प्रमुख कार्यवाह अॅड. आस्वाद पाटील, उपाध्यक्ष बाबुराव चांदोरे,  कोषाध्यक्ष अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू शांताराम जाधव, सहसचिव प्रकाश बोराडे, नाशिक जिल्हा कबड्डी असोशिएशन चे अध्यक्ष आमदार जयंत जाधव, आमदार हेमंत टकले, जिल्हा कबड्डी असोशिएशन चे प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड, डॉ. शरद शिंदे, संयुक्त कार्यवाह प्रशांत भाबड, विलास पाटील, शरद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

nashik on web news online live weather dhol

१७ व्या राज्य कबड्डी दिनाचे पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे :

किशोर गट

१) सुरज आनंदराव पाटील (नंदुरबार),२) महेश राजेश भोईर (ठाणे) ३) करण धर्मेंद्र भगत (रायगड)

किशोरी गट

१) पायल सुनील वसवे, २) राधा विलास मोरे ३) ऋतुजा अनिल लांडे, (सर्व पुणे)

कुमार गट

१) बबलू बन्सी गिरी (पुणे) २) सुरज शंकर दुंडले (ठाणे) ३) अनिकेत देवेंद्र पेवेकर (मुंबई शहर)

कुमारी गट

१) सोनाली रामचंद्र हेळवी (सातारा) २) काजळ शंकर जाधव (पुणे) ३) तेजश्री श्रीकृष्ण सारंग (मुंबई शहर)

Maharashtra State Kabaddi Day Awards Announced nashik sports

वरील प्रत्येक खेळाडूला रुपये ५००० रोख शिष्यवृत्ती स्व. बाबाजी जामखेडकर, स्व. मुकुंद जाधव, स्व. शंकरराव साळवी यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल स्व. रामचंद्र चव्हाण व स्व. सीताबाई चव्हाण यांच्या स्मरणार्थ जगन्नाथ चव्हाण यांच्याकडून प्रत्येकी रुपये २५०० रोख शिष्यवृत्ती अतुल गणपती पाटील (सोलापूर) व ऐश्वर्या सुरेश पाटील (पालघर) यांना देण्यात येणार आहे.

सर्वात उत्कृष्ट चढाईपटू पुरुष गट मंगेश संपत भगत (पुणे), सायली संजय केरीपाळे महिला गट (पुणे) यांना रुपये ५००० रोख पारितोषिक स्व. मल्हारपंत बावचकर यांच्या स्मरणार्थ कलाप्पा बा. आवडे यांच्याकडून देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट खेळाडूचा रुपये १०००० रोखचा बहुमान पुणे जिल्ह्याचा विकास बबन काळे तर मुंबई उपनगरच्या  कोमल सुभाष देवकर ने पटकाविला.

जेष्ठ कार्त्याकर्ता पुरस्कार :

१) हिराचंद पोसू पाटील (रायगड), २) पुंडलिक शेजूळ (औरंगाबाद)

जेष्ठ पंच :

१) यशवंत ज्ञानेश्वर चोंदे (ठाणे) २) सुरेश जाधव (मुंबई उपनगर)

जेष्ठ पत्रकार :

१) लक्ष्मण चव्हाण (बीड), २) दिगंबर शिंगोटे (पुणे)

जेष्ठ खेळाडू :

१) नामदेव तापकीर (पुणे, २) दौलतराव गोविंद पारकर (मुंबई शहर), ३) इब्राहीम विजापुरे (सोलापूर)

पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशनने  गुणानुक्रमे प्रथम जिल्ह्याचा पुरस्कार पटकाविला.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.