महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेची  सांगता,मुंबई संघ विजेता

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेची  सांगता

कॅरमच्या खेळाडूंनी शासनाच्या योजनांच्या लाभ घ्यावा  – डॉ .जयप्रकाश दुबळे ( क्रीडा उपसांचालक – नाशिक विभाग)

 नाशिक जिल्हा कॅरम अससोसिएशन आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि  कै. के एन. डी. मंडळ आणि क्रीडा साधना यांच्या सहकार्याने नाशिकमध्ये दिनांक २३ आणि २४ सप्टेंबर रोजी ५३ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशन जवळील महेश भवन, सिडको, नवीन नाशिक या  ठिकाणी करण्यात आले होते . या स्पर्धेच्या समारोप मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक नानासाहेब महाले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रीडा सप्तहाअंतर्गत या महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या खेळाडूंना नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, या प्रभागाच्या नगरसेविका सौ छाया देवांग, सामाजिक कार्यकर्ते दिलीप देवांग यांच्या हस्ते पारितोषिके आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी मंचावर महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सहसचिव संतोष पवार, पंच प्रमुख परमिनदरसिंग,  राजेंद्र फणसाळकर आदी मान्यवर उपस्तीत होते. सर्व मान्यवरांचे स्वागत नाशिक जिल्हा कॅरम असोसिएयशांचे सचिव अशोक कचरे, आनंद खरे, संचालक शकील खान, नितीन हिंगमिरे यांनी केले.

या वेळी डॉ जयप्रकाश दुबळे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना सांगितले की आज सर्व खेळासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. शासनाच्या वतीने खेळाडूंना २५ मार्क आणि शासकीय कार्यालयामध्ये ५ टक्के आरक्षण आहे. कॅरम या खेळाचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे कॅरमच्या खेळाडूने हे लक्षात घेऊन या खेळात प्रगती करावी असे सांगून या स्पर्धेच्या चांगल्या आयोजनाबद्दल संयोजकांना धन्यवाद दिले. नगरसेविका छाया देवांग यांनी बोलतांना सांगितले  की जास्तीत जास्त युवकांना प्रोस्ताहन आणि  सांधी  मिळावी यासाठी आमच्या वतीने नेहमीच प्रयत्न केले जातात.  त्यामुळे अश्या राज्यस्तरीय स्पर्धांना मदत आणि सहकार्य मिळण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. त्यामुळे अश्या स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंनी प्रगती करावी असे सांगितले. या समारंभाचे सूत्रसंचालन आनंद खरे यांनी केले. तर आभार नितीन हिंगमिरे यांनी मानले.

या स्पर्धामध्ये १२ वर्षातील मुले आणि मुली तसेच १४ वर्षातील मुले  आणि मुली अश्या दोन गटांचा समावेश होता. यामध्ये मुंबईच्या मुलांनी आणि मुलीनीही उत्कृष्ट खेळ करून विजेतेपद पटकावले,तर ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघरच्या खेळाडूंनीही चांगली कामगिरी करून प्रतितोषिके मिळविली.

या ५३व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील खेळाडूच्या कामगिरीच्या आधारेमिनी गटाच्या  पहिल्या चार खेळाडूंची  आणि सब ज्यूनीयर  गटाच्या आठ – आठ खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली आहे. हे निवड झालेले खेळाडू पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होतील अशी माहिती नाशिक जिल्हा कॅरम संघटनेचे सचिव अशोक कचरे यांनी दिली.

 या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी  आनंद खरे,  अशोक कचरे, नितीन हिंगमिरे, शकील खान, प्रशांत भाबड, उमेश सेनभक्त, कपिल पगार, तसेच नाशिकचे खेळाडू आणि संघटक यांनी चांगले प्रयत्न केले.

स्पर्धेचा  निकाल :-

१२ वर्षे मुले :- १) नीलेश चिपळूणकर (मुंबई) २) अनिरुद्ध चव्हाण (मुंबई) ३) अपूर्व शेळके (पुणे) ४) मयूर अंदाळ  (सिंधुदुर्ग )

१२ वर्षे मुली  :-१) सखी दातार  (ठाणे ) २) मधुरा अदालवी (ठाणे ) ३) सारा करिया (मुंबई ) ४) सिमरन शिंदे (मुंबई  )

१४ वर्षे मुले –   १)ओजस जाधव  (मुंबई) २) सजल गायकवाड (मुंबई) ३) ओम तावरे (पुणे) ४) डेव्हिड बोनल (पालघर ) ५) मयुरेश नाईक (सिंधुदुर्ग )६) प्रथम मेहता (मुंबई)  ७) विवेक चव्हाण (पालघर ), ८) अस्मिता भक्त (पालघर )

१४ वर्षे मुली – १) श्रुती सोनावणे (मुंबई) २) केशर निर्गुण  (सिंधुदुर्ग) ३) अमुल्या राजुला (मुंबई ) ४) नेहा शहा (रायगड ) ५)आकांक्षा कदम (रत्नागिरी ) ६) मानसी पंडित(मुंबई उपनगर)  ७) समृद्धी घडोनकर (ठाणे ), ८)प्रज्ञा संपनार (नाशिक )

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.