समृद्धी महामार्ग मोबदला भाऊबंद्कीच्या जीवावर , गर्भवती सह भावांवर जीवघेणा हल्ला

नाशिक : समृद्धी महामार्ग हा घोषित केल्यापासून वादात सापडला आहे. या महामार्गाला नाशिक सिन्नर,इगतपुरी परिसरातून शेतकरी वर्गाचा मोठा विरोध आहे. तर काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी सरकारला आर्थिक मोबदला घेवून दिल्या आहेत. मात्र यातून मिळालेल्या पैसे आता भावा-भावा भांडणे लावत आहेत. असाच प्रकार इगतपुरी येथे घडला आहे.

आर्थिक मोबदला दोन भावांनी परस्पर घेतला, योग्य वाटप झाले नाही या विरोधात पोलिसात फिर्याद  दाखल केली या रागातून इतर भावांनी तक्रारदार भावांवर जीवघेणा हल्ला केला आहे. तर बाळांतपणासाठी घरी आलेल्या आणि भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेला सुद्धा जबर मारहाण झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, इगतपुरीमध्ये गर्भवती महिलेसह तिघांवर कोयत्याने हल्ला करण्यात आले आहेत. कुटुंबीयांनी एकमेकांशीच भांडण करत हा हल्ला केला आहे. या प्रकरणी गर्भवती जयश्री गतीर हिच्यासह सरिता गीते, आरती गीते, संजय गीते, कृष्णा गीते यांना कोयता, लाकडी दांडे, पाईप आणि डोळ्यात मिरची पावडर टाकून विष्णू गीते, कुंडलिक गीते, लक्ष्मण गीते, पांडू गीते, काळू गीते, यादव नवले, हिरामण नवले, किशोर गोईकने, भागी गोईकने, द्वारका नवले या सगळ्यांनी अचानकपणे येत जबर मारहाण केली आहे.

हा सर्व प्रकार समृद्धी महामार्गाच्या पैशाच्या वादातून घडला आहे. समृद्धी महामार्गाला जमीन दिल्यानंतर या शेतकरी कुटुंबाला  ७४ लाख मिळाले होते. मात्र हा पैसा कसा आणि किती घेणार यावरून कुटुंबामध्ये वाद झाला होता. याबाबत  त्यानंतर ही मारहाण करण्यात आली. समृद्धी महामार्गाला जमीन देण्यात आल्याने पैसे मिळाले होते, मात्र सर्वांना समान हिस्सा न मिळाल्याने कुटुंबियांमध्ये वाद आहे. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग आता भाऊ , बहिणींच्या जीवावर उठतोय का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामधील गर्भवती महिलेसह इतर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत इगतपुरी ग्रामीण पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदवली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.