सटाणा : पूर्णवेळ तहसीलदार द्या अन्यथा आत्मदहन; मनसेचे निवेदन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभागीय अधिकारी बागलाण यांना निवेदन

सटाणा शहराला गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णवेळ तहसीलदार नसून याबाबत पाठपुरावा करूनही काहीच हाती लागत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी आत्मदाहनाचा इशारा देणारे निवेदन प्रांत अधिकाऱ्यांना दिले आहे. Maharashtra Navnirman Sena Satana Baglan warns administration Tehsildar Issue

सटाणा शहराला गेल्या 8 महिन्यापासून कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने मनसे बागलाणच्या वतीने 10 एप्रिल 2018 रोजी सटाणा तहसिल कार्यलयात गेट बंद आंदोलन केले होते. परंतु त्या वेळी प्रातांधिकारी यांनी वेळीच येऊन आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या. आणि निवेदन स्वीकारून लवकरच शासना स्थरावर प्रयत्न करून कायमस्वरूपी तहसीलदार नेमणुक करू असे आश्वासन दिले.

 

परंतु 2 महिने उलटून गेले असले तरी प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. म्हणून मनसे बागलाणतर्फे आत्मदहणाचा इशारा देण्यात आला आहे. Maharashtra Navnirman Sena Satana Baglan warns administration Tehsildar Issue

कायमस्वरूपी तहसीलदार नसून प्रभारी तहसीलदार म्हणून कोणत्याही स्तरावरील शासकीय अधिकाऱ्यांना येथे पाठविण्यात येते. त्यांना तालुक्याचे कामकाज समजून घेण्यासाठी महिनाभराचा काळ होत नाही तोवर त्यांच्या जागी नव्या प्रभारीची नेमणूक होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यामुळे महसुली कामांवर प्रचंड परिणाम झाला असून इतरही कामे थांबल्यामुळे सर्वमान्यांचीही नाहक परवड होत आहे.

 

Maharashtra Navnirman Sena Satana Baglan warns administration Tehsildar Issue

येत्या 4 जुलै पर्यत कायमस्वरूपी तहसिल याची नियुक्ती न झाल्यास 4 तारखेला केव्हा ही आत्मदहन करण्याचा इशारा मनसे तालूकाध्यक्ष सतीश विसपुते शहराध्यक्ष पंकज सोनवणे हर्षवर्धन सोनवणे मंगेश भामरे यांनी निवेदनात दिला आहे.

Maharashtra Navnirman Sena Satana Baglan warns administration Tehsildar Issue
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.