मॉन्ट ब्लँक नावाच्या नकली वेबसाईटपासून सावध राहण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

लॉकडाऊन काळात ४०४ गुन्हे दाखल; २१३ जणांना अटक

मुंबई दि.२१-  मॉन्ट ब्लँक (Mont Blanc) नावाच्या नकली वेबसाईटसंदर्भात आर्थिक  फसवणुकीच्या अनेक तक्रारी येत आहेत. या नकली वेबसाईटपासून सावध राहावे असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.

 फेक वेबसाईट

 सध्या लॉकडाऊनच्या काळात बरेच सायबर भामटे खोटे मेसेजेस व फेक वेबसाईट बनवून लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. Mont Blanc या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या नावाने सध्या बरेच मेसेजेस व पोस्ट व्हायरल होत आहेत. या कंपनीने आपल्या आंतरराष्ट्रीय उत्पादनांवर विशेषतः त्यांच्या शाई पेन या उत्पादनावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनच्या काळात सूट दिली आहे व सर्वांनी त्यांच्या वेबसाईटवरून त्यांची उत्पादने  विकत घ्यावीत . महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की जर तुम्हाला अशा कोणत्या प्रकारचा मेसेज आला व खालील पैकी कोणत्याही वेबसाईटचे नाव त्या मेसजमध्ये दिसल्यास त्यावर क्लिक करू नये. कारण त्या वेबसाईट या सायबर भामट्यांनी लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याकरिता बनविलेल्या फेक वेबसाईट आहेत.

फेक वेबसाईटची नावेhttps://montblancindia.cohttps://montblancsindia.comhttps://montblancindias.comhttps://montblancindia.orghttps://montblancindia.co

Mont Blanc या आंतरराष्ट्रीय कंपनीचे अधिकृत विक्रेते हे टाटा क्लिक (Tata Cliq) आहेत व त्यांची वेबसाईट https://luxury.tatacliq.com/अशी आहे. त्यामुळे जर कोणत्याही नागरिकांनी वरीलपैकी कोणत्याही फेक वेबसाईटवर खरेदी केली असेल व त्यांना डुप्लिकेट वस्तू किंवा अजून खरेदी केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी मिळाली नसेल तर त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार द्यावी व www.cybercrime.gov.in  या वेबसाईटवर देखील त्याची नोंद करावी. असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर विभाग यांच्या वतीने करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या काळात राज्यात सायबर संदर्भात ४०४ गुन्हे दाखल झाले असून २१३ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.