state Legislative Council उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर आठही उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारसमोरील संकट अखेर संपलं आहे. सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडुन मिळाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी तीन वाजेपर्यंत होती. त्यानंतर अधिकृत निकालाची घोषणा करण्यात आली.state Legislative Council

Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray and eight others elected unopposed to state Legislative Council: Official558

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र, राज्यावर कोरोनाचं संकट गहिरं झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः प्रयत्नशील होते. पण उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज्य विधी मंडळाच्या एका सभागृहाचे सदस्य झाले आहेत. ते पहिल्यांदाच विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, भाजपचे रणजीतसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडाळकर, प्रवीण दाटके आणि रमेश कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. या सर्वांची बिनविरोध निवड झाली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यानी नोव्हेंबरमध्ये राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ते राज्य विधी मंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे प्रतिनिधी नसल्यानं २७ मे २०२० पूर्वी त्यांना एका सभागृहाचे सदस्य होणे गरजेचे होते.state Legislative Council

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.