महाकॉन २०१८ : रेरामुळे बांधकाम व्यावसायिकांचा  सन्मान  उंचावला – गौतम चटर्जी

रेरामुळे बांधकाम व्यावसायिकांचा  सन्मान  उंचावला – गौतम चटर्जी

महाकॉन २०१८ च्या शुभारंभ प्रसंगी प्रतिपादन

नाशिक – पारदर्शकता हा गाभा असलेल्या महारेरा कायद्यास महराष्ट्रातील बहुसंख्य बांधकाम व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून रेरामुळे बांधकाम व्यावसायिकांचा सन्मान  उंचावून खऱ्या अर्थाने बांधकाम व्यवसायास उद्योगाचा दर्जा प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन महारेराचे चेअरमन गौतम चटर्जी यांनी केले. ते क्रेडाई महाराष्ट्रातर्फे नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित ‘महाकॉन’ या दोन दिवसीय  राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.Mahakon 2018 rera boosts builders’ honor Gautam Chatterjee

याप्रसंगी व्यासपिठावर क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई महाराष्ट्राचे प्रेसिडेंट इलेक्ट सतीश मगर, परिषदेचे समन्वयक गिरीश रायभागे, क्रेडाई नॅशनलच्या कार्यकारी समितीचे सभासद अनंत राजेगांवकर, क्रेडाई नॅशनलच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष जितुभाई ठक्कर व क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष सुनील कोतवाल हे उपस्थित होते.Mahakon 2018 rera boosts builders’ honor Gautam Chatterjee

   “वारे बदलाचे” या संकल्पनेवर आयोजित या परिषदेस महाराष्ट्रातील ५१ शहरातील सुमारे १००० बांधकाम व्यावसायिक उपस्थित आहेत.

महारेराच्या सुरुवातीनंतरच्या पहिल्या वर्षातील घटनांचा आपल्या भाषणात आढावा घेतांना गौतम चटर्जी म्हणाले की, महारेरापूर्वी विविध कारणांनी बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यात अनेकदा संशयाचे वातावरण व दुरावा होतो. पण रेरा मधील पारदर्शकतेने हा दुरावा नाहीसा झाला असून प्रकप्लाबाबत आर्थिक शिस्त व जबाबदारीने बांधकाम व्यवसायाबाबत चांगले वातावरण निर्माण झाले आहे. प्रकल्पामध्ये बुकिंग करणारा ग्राहक हा आपल्या प्रकल्पाचा भागधारक असून निरंतर संवादाने व्यवसायास उज्वल भविष्य आहे असेही ते म्हणाले. महारेरा सारख्या कायद्याने बांधकाम व्यवसायात पारदर्शकता आल्याने जागतिक बाजार पेठेतही मागणी वाढली असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सतीश मगर – क्रेडाई नैशनलच प्रेसिडेंट (इलेक्ट)

महारेरा मुळे वैचारिकता बदलाची सुरुवात झाली आहे. रेग्युलेशन मुळे दूरसंचार, इंन्शुरन्स हे व्यवसाय जसे वाढले तसेच रेरा मुळेही भविष्यात बांधकाम व्यवसाय वाढेल. कमी किमतीच्या गृह निर्माणामध्ये अनेक संधी असून याकडेही बांधकाम व्यावसायिकांनी लक्ष द्यावे असा सल्लाही त्यांनी दिला.

शांतीलाल कटारिया – क्रेडाई महाराष्ट्रचे  अध्यक्ष

महाकॉन मुळे अनेक वेगळ्या  विषयांवर विचार मंथन होऊन बांधकाम व्यवसायास नवी दिशा मिळेल. क्रेडाई हि लहान शहरांपासून ते देशपातळीवर बांधकाम व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था असून बदलत्या काळानुसार व्यवसाय करण्याची पद्धत बदल्यास भविष्यकाळ उज्वल आहे. नैसर्गिक वरदान, पौराणिक वारसा  व आधुनिकतेची कास यशस्वीतेपणे धरलेले   नाशिक हे एक शहर असून अत्यंत आल्हादायक वातावरणाचे वरदान या शहराला लाभले आहे. अन्य सर्व शहरांशी हि ते उत्तमरित्या जोडलेले आहे.

सुनील कोतवाल – क्रेडाई नाशिकमेट्रोचे अध्यक्ष

या परिषदेचा मुख्य उद्देश सर्व सदस्यांना विविध बदलाबाबत प्रशिक्षित करून ज्ञान संवर्धनासोबत  जागरूक करणे असून बदलत्या परिस्थितीत सफल व्यवसायासाठी या परिषदेतून मिळालेल्या माहितीचा निश्चितच लाभ होईल. नाशिकला दिलेल्या यजमान पदामुळे नाशिकची ओळख महाराष्ट्राच्या अन्य शहरातून आलेल्या बांधाकाम व्यावसायिकांना होईल. सर्वांच्या सामाईक प्रयत्नाने जवळपास १००० व्यावसायिक नाशिकमध्ये आले आहेत.

गिरीश रायबागे – महाकॉन समन्वयक

संक्रमण स्थितीतून जाणा-या बांधकाम व्यावसायिकासाठी हि वेगळ्या धर्तीवरील महाकॉन असून देशात राज्यस्तरावर आयोजित बांधकाम व्यावसायिकांचा हा सर्वात मोठा कार्यक्रम ठरेल.

Mahakon 2018 rera boosts builders’ honor Gautam Chatterjee

राज्य मराठी पत्रकार संघाकडून ५०० वारकऱ्यांना रेनकोट वाटप

लासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव 12 जुलै 2018

लासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव 12 जुलै 2018

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.