महाकॉन २०१८ खऱ्या अर्थाने ठरतेय ज्ञान संवर्धनाची पर्वणी

नाशिक –  क्रेडाई महाराष्ट्र आयोजित महाकॉन परिषदेचे दि. १३ जुलै चे दुसरे सत्र खऱ्या अर्थाने ज्ञानवर्धक ठरले. “वारे बदलाचे” या संकल्पनेवर आयोजित या राज्यस्तरीय परिषदेस अनेक नामवंत वक्त्यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.

टायटल इन्शुरन्स या विषयावर आय. पी. इनामदार यांनी मार्गदर्शन केले. तर आरती हरभजनका, दिलीप मुगलीकर, पंकज कोठारी व सचिन कुलकर्णी यांनी पंतप्रधान आवास योजनेमध्ये पब्लिक – प्रायव्हेट पार्टनरशिप या महत्वाच्या विषयावर सखोल चर्चा केली.

रिअल इस्टेट मधील मार्केटिंग बाबतच्या आपल्या अनुभवाचे कथन सेतू अॅडव्हर्टायझिंगच्या ऋग्वेद देशपांडे यांनी करतांना बांधकाम व्यावसायिकांना मार्केटिंगच्या टिप्स दिल्या. अंकुर पंधे टायर २ व टायर ३ शहरातील परवडणारी घरे या विषयांवर मत मांडली. तर अभिजित प्रधान यांनी “मास कन्स्ट्रकशन” या विषयावर मार्गदर्शन केले. विविध आर्थिक बाबींवर सी. ए. विनीत देव यांनी मार्गदर्शन केले.

रेरा कायद्यामुळे आर्थिक शिस्त महत्वाची आहे त्यामुळे कर्नल अजय कुमार सिंग यांच्या खर्चाच्या योग्य नियोजन या विषयावरील मार्गदर्शनाने उपस्थितांना भरपूर लाभ झाला.   “प्लॉटिंग  एक नवे व्यवसाय विश्व” या विषयावर आर्कि.रवि कदम, गौतम संचेती, किरण चव्हाण व शांतीलाल कटारिया या वक्त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक नव्या संधीचे दालन उघडे केले.

उद्या दि. १४ रोजी महाराष्ट्र राज्याचे सेटल्मेंट आयुक्त व संचालक  लॅन्ड रेकॉर्ड एस चोक्कलिंगम, बोमन इरानी, अनुज पुरी, मंगल प्रधात लोढा, गीतांबर आनंद, इरफान रझाक, जक्षय शहा, मनोज गौर असे मानवंत वक्ते मार्गदर्शन करणार आहे.

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.