मॅग्नेटिक महाराष्ट्र : अन्न प्रक्रिया व वस्त्रोद्योग क्षेत्रात रोजगाराच्या मुबलक संधी

• आकर्षक पॅकेजिंग व उत्तम ब्रँडिंग काळाची गरज

• महाराष्ट्र हे रोजगार निर्मितीत अग्रेसर राज्य

• कुशल मनुष्यबळाची सर्वत्र मागणी

वस्त्रोद्योग व अन्न प्रक्रिया उद्योगात रोजगाराच्या असंख्य संधी आहेत. मात्र पॅकेजिंग व ब्रँडिंग प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. आपल्या उत्पादनाला केवळ देशातच नाही तर जागतिक बाजारपेठेत मागणी वाढावी असे वाटत असेल तर आकर्षक पॅकेजिंग व उत्तम ब्रँडिंग काळाची गरज आहे. यातून सुद्धा रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र हे रोजगार निर्मितीत अग्रेसर राज्य असून मॅग्नेटिक महाराष्ट्र या परिषदेच्या माध्यमातून राज्यात रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असा सूर चर्चासत्रात उमटला. मॅग्नेटिक महाराष्ट्र-कन्व्हर्जन्स 2018 या गुंतवणूकदाराच्या परिषदेत आयोजित एम्प्लॉयमेंट इंटेनसिव्ह इंडस्ट्रीज (प्रक्रिया उद्योग व वस्त्रोद्योग) या विषयांवरील चर्चासत्रात गौतम सिंघानियाअनिशा धवन,अवनी दावडाजमशेद दाबूलार्स दिथमेर व संकल्प पोटभरे हे उद्योग क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. चर्चासत्राचे संचलन अनिशा धवन यांनी केले.

    सबका साथ सबका विकास‘ साकार करायचे असल्यास रोजगार निर्माण करावे लागतील. महाराष्ट्र देशातील सर्वात मोठे उद्योग राज्य आहे. जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण होतील तेव्हा आपसूकच विकास दर वाढेल. महाराष्ट्रात उद्योगाला सकारात्मक वातावरण आहे. महाराष्ट्र हे मुलभूत सुविधा पुरविणारे सर्वात अग्रेसर राज्य आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात रेमंड ने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण केला आहे. यापुढे ही रोजगार निर्मितीला रेमंडचे प्राधान्य राहणार आहे.

1925 ला रेमंड ग्रुपची स्थापना झाली आहे. चारशे पेक्षा जास्त शहरात रेमंड व्यवसाय सुरू आहे. 150 रुपायापासून ते 3 हजार रुपये मीटर पर्यंत रेमंडचे कापड उपलब्ध आहे. मेक इन इंडिया नंतर रेमंड ने महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे.गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्राने उद्योग क्षेत्रात खूप भरारी घेतली असल्याचे गौतम सिंघानिया यांनी सांगितले.

टाटा हे नाव जगात परिचित आहे. अन्न प्रक्रिया उद्योगात टाटाने महाराष्ट्राचे उद्योग धोरण अतिशय उत्तम आहे. अन्न प्रक्रिया उद्योगासाठी पुरवठामागणी या दृष्टीने महाराष्ट्र हे समृद्ध राज्य आहे. शेती उत्पादनात वाढ झाल्यास रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. शेतकरी यांच्या सोबत अन्न प्रक्रिया क्षेत्रात चांगले काम करत आहोत  असे जमशेद दाबू यांनी सांगितले.

86 टक्के व्यवसाय हा अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित आहे. अन्न प्रक्रिया उद्योगाला महाराष्ट्रात खूप मोठे भविष्य आहे. येथील बाजारपेठ अतिशय सकारात्मक व समृद्ध आहे असेसंकल्प पोटभरे यांनी सांगितले.

अन्न प्रक्रिया उद्योग हा मागणीवर आधारित आहे. हा उद्योग खुप रोजगार देणारे क्षेत्र आहे. अन्न प्रक्रिया रिटेलिंग मध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या रोजगाराच्या मुबलक संधी आहेत. अन्न प्रक्रिया उद्योगात रोज नवनवीन उत्पादन बाजारात येत असतात त्यामुळे कुशल मनुष्यबळाची खूप मोठी मागणी या क्षेत्राला आहे. मात्र कौशल्य प्राप्त तरुणांची वाणवा या क्षेत्रालाही जाणवत आहे. महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकासाच्या दृष्टीने चांगले पाऊल टाकले आहे.

            महाराष्ट्रात टेक्सटाईल पार्क उभारणारे रेमंड हे पहिले आहे. यवतमाळ येथे रेमंडचे  युनिट आहे अमरावती येथील टेक्स्टाईल पार्क मध्ये ही रेमंड आपले युनिट लावत आहे. रेमंडने महाराष्ट्रात 5 हजार थेट रोजगार निर्माण केले आहेत. रेडिमेड गारमेंट ला खूप भविष्य आहे.

            कुठल्याही उद्योगात कुशल मनुष्यबळ हा महत्त्वाचा घटक असतो. कुशल मनुष्यबळाच्या भरवशावर कंपनी प्रगती करत असते. अति यांत्रिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी हिरावल्या जातात हे पूर्ण सत्य नसून यांत्रिकीकरणाच्या मागे सुद्धा रोजगाराची मोठी साखळी निर्माण होत असते हे ही तेवढंच खरे आहे.

अन्न सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे. शेतमालाला भाव न मिळाल्याने शेतकरी शेतमाल रस्तावर फेकताना दिसतो. अशा परिस्थितीत अन्न प्रक्रिया उद्योगावर याचा विपरीत परिणाम होतो असे वाटत  नाही कायावर मत मांडताना अवनी दावडा म्हणाल्या योग्य वेळी योग्य पीक घेण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी लागणार आहे. गुणवत्ता पूर्ण उत्पादन महत्त्वाचे आहे. शेतकरी व शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात असंघटीत आहे. शेतकरी आणि उद्योग यांच्या मध्ये थेट व्यवहार व्हावा. मध्यस्थी मूळे शेतकऱ्यांच्या मालाला कमी भाव मिळतो. आशा परिस्थितीत नुकसान होते ते शेतकऱ्यांचेच. मध्यस्थीची साखळी तोडल्यास चित्र बदलेल दिसेल.

वस्त्रोद्योग क्षेत्रात ग्रोथ कुठल्या मार्गाने येईल गृह उत्पादनातून की आयातीमुळे या प्रश्नावर बोलताना गौतम सिघांनीया म्हणालेगुणवत्तापूर्ण उत्पादनातून ग्रोथ नक्कीच होईल.

राज्याने उद्योगासाठीच्या परवानग्याची संख्या घटवली आहे चांगली बाब आहे.सोबतच कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उघडले आहेत ही बाब उद्योग क्षेत्राला नवी संजीवनी देणारे ठरणार आहे. सध्या ब्रँडिंगचा जमाना आहे. त्यामुळे आपल्या उत्पादनाचे ब्रँडिंग अतिशय आवश्यक आहे. पॅकेजिंग आणि ब्रँडिंग गरजेचे असून यातून सुद्धा रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतात.असे या चर्चा सत्रातील वक्त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांच्या प्रश्नाला मान्यवर वक्त्यांनी उत्तरे दिली.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.