सत्ताधाऱ्यांच्या हुजऱ्यांची शिवरायांवर कुरघोडी; मॅग्नेटिक महाराष्ट्रसाठी उतरवले प्रभो शिवाजी राजाचे होर्डिंग्ज

महाराष्ट्र शासनाचा नवा प्रताप

“छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदीनां साथ” असे म्हणत महाराष्ट्र काबीज करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला शिवरायांचीच अॅलर्जी होऊ लागली असल्याचे समोर येत आहे. पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्या प्रसंगी “प्रभो शिवाजी राजा” या पहिल्या मराठी अ‍ॅनिमेशनपटाचे मुंबईतील अनेक होर्डिंग बेदरकारपणे उतरवून मॅग्नेटिक महाराष्ट्रचे होर्डिंग लावण्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे. magnetic maharashtra governmnt malpracticed again removed prabho shivaji rajas hoarding

“प्रभो शिवाजी राजा” हा मराठी चित्रपट स्रुष्टीतील अ‍ॅनिमेशनपटाचा पहिलाच प्रयोग असुन आज दि. १६ फेब्रुवारी २०१८ पासुन महाराष्ट्रभरात प्रदर्शीत होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून भारताच्या भावी पिढ्यांवर छत्रपती शिवरायांचे संस्कार व्हावेत यासाठी मुलांना आवडणाऱ्या अ‍ॅनिमेशन या माध्यमांतून शिवरायांची गाथा मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे केला जाणार आहे.

या अ‍ॅनिमेशनपटाची माहिती जास्तीत जास्त शिवप्रेमींपर्यंत पोहचावी या उद्देशाने लाखो रुपये खर्च करुन आपण मुंबई महानगरामधे अधिकृतपणे होर्डिंग लावले होते. परंतू १८ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रमासाठी “प्रभो शिवाजी राजा” चे अनेक होर्डिंग कोणतीही पुर्वकल्पना न देता बेदरकारपणे उतरवण्यात आले आहेत. magnetic maharashtra governmnt malpracticed again removed prabho shivaji rajas hoarding

उपरोक्त घटना बघता याचसाठी केला होता का अट्टाहास अशी प्रतिक्रिया आता मराठी मनामनांत उमटेल हे नक्की.

महाराष्ट्र शासनाचा नवा प्रताप, magnetic maharashtra governmnt malpracticed again removed prabho shivaji rajas hoarding, प्रभो शिवाजी राजा, पहिला मराठी अ‍ॅनिमेशनपट, मुंबईतील अनेक होर्डिंग बेदरकारपणे उतरवले, मॅग्नेटिक महाराष्ट्र, narendra modi, cm devendra fadnavis, hoardings in mumbai
– निलेश मुळे, दिग्दर्शक, प्रभो शिवाजी राजा

“मॅग्नेटिक महाराष्ट्र” या कार्यक्रमासाठी कोणत्याही कोर्पोरेट कंपन्यांचे होर्डिंग न उतरवता छत्रपती शिवरायांच्या चित्रपटाचे होर्डिंग उतरवले गेले याचं प्रचंड दुःख होत आहे.

हा चित्रपट खरतर मैग्नेटीक महाराष्ट्र व डिजीटल इंडिया अभियानाचे उत्तम उदाहरण ठरु शकला असता परंतू सरकारी उपक्रमासाठीच या उपक्रमाची गळचेपी व्हावी हे मोठं दुर्देवं आहे.

हा खोडसाळपणा करणाऱ्यांवर कारवाई करुन मराठीमधे नव्याने रुजू पाहणाऱ्या अ‍ॅनिमेशनपटच्या या प्रयोगाला सरकारने पाठबळ द्यावं अशी आमची विनंती आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.