‘एम पासपोर्ट’ : ऑनलाईन पोलीस पडताळणी सेवा आता नाशिकमध्येही; पुणे, ठाणे नंतर तिसरे शहर

Share this with your friends and family

नाशिक : नाशिकने ‘डिजिटल इंडिया’ या योजने अंतर्गत अजून एक सेवा अंगिकारली असून आज (दि. ११) नाशिक पोलीस आयुक्तालयाने ‘एम पासपोर्ट’ ही ऑनलाईन पारपत्र सेवा शहरवासियांसाठी सुरु केली आहे. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते या कार्यप्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. याआधी पुणे आणि ठाणे शहरात ही कार्यप्रणाली सुरु असून नाशिक हे तिसरे शहर ठरले आहे. त्यामुळे पारपत्र काढताना नागरिकांच्या सुविधेत वाढ होणार असून प्रणालीत पारदर्शकता येणार आहे.

या ‘एम पासपोर्ट’ प्रणालीमध्ये नाशिक शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना टॅब्लेट फोनचे वितरण करण्यात आले असून त्यात इंस्टाॅल असलेल्या ‘एम पासपोर्ट’ या अॅप द्वारे अर्जदाराच्या घरी जाऊन प्रशिक्षित पोलीस कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची कॉपी स्कॅन करून पुढे आयुक्तालयाला पाठवायची आहे. याद्वारे पोलीस कर्मचारी थेट अर्जदाराच्या घरी जाणार असल्याने पत्ता बरोबर असल्याची खात्री लगेचच होणार आहे.

एम पासपोर्ट या अॅप द्वारे अर्जदारांना अर्ज करण्याचीही सुविधा असून यामुळे अर्ज भरणे, मुलाखतीची वेळ घेणे, पोलीस पडताळणी अशा सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याआहेत.

m passport nashik police

प्रमाणे अर्जदारांना पोलीस स्टेशनला जाण्याचा होणारा त्रास होणार नसून कागदपत्रे तसेच फोटो स्कॅन करून त्यांच्यासमोरच अपलोड केले जाणार आहेत. त्यामुळे पडताळणीसाठी लागणारा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया योजनेमध्ये या कार्यप्रणालीचा समावेश आहे. ऑनलाईन स्कॅनिंग केल्यामुळे ही कागदपत्रे थेट सर्व्हरमध्ये जाणार असल्याने कागदपत्रे कुठे ठेवण्याची आवश्यकता नसून ती सांभाळण्याचा ताण कमी होणार आहे.

प्रत्येक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला एसएमएस द्वारे माहिती पुरविण्यात येणार असल्यामुळे या सुविधेची खात्री वाढण्यास मदत होणार आहे.

या कार्यप्रणाली बाबत पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. कमी मनुष्यबळ आणि पडताळणीसाठी कमी वेळ असा दुहेरी फायदा होणार आहे.

उद्घाटना आणि प्रशिक्षणवेळी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विजय मगर, परिमंडळ एकचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, परिमंडळ दोनचे उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे, सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पासपोर्टचे काम करणारे कर्मचारी उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.