Water Supply Nashik NMC सोमवारी शहरात पाणी पुरवठा नाही

मंगळवारी कमी दाबाने पाणी मिळणार

नाशिक प्रतिनिधी विविध कामे आवश्यक असल्याने गंगापूर धरण, चेहेडी पंपींग स्टेशन व मुकणे धरण पंपींग स्टेशन येथील वीज पुरवठा येत्या दि.13 रोजी बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे गंगापूर धरण, चेहडी बंधारा व मुकणे धरण पंपींग स्टेशन येथे रॉ वॉटर पंपींग होणार नाही. त्यामुळे संपूर्ण नाशिक शहरात दि. 13 रोजी सकाळी 9 वाजेपासून संपूर्ण दिवसभर व सायंकाळी पाणी पुरवठा होणार नाही. तसेच दि. 14 जानेवारी रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने आणि कमी प्रमाणात होणार आहे. Water Supply Nashik NMC

मनपाचे गंगापूर धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथील 3.3 केव्ही केबलची फिडरला जोडणी करणे, पाथर्डी फाटा येथील क्रॉस कनेक्शनचे काम करणे, बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र 3 लक्ष गॅलन टाकीचा इनलेट पाईपवरील लिकेज दुरुस्ती, सबस्टेशन येथील सीटीपीटी बसविणे, शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथील सेकंड फेज फिल्टर बॅकवॉश व्हॉल दुरुस्ती करणे, पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील क्लॅरीफायर लिकेज दुरुस्ती करणे, नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथील सबस्टेशन पीटी बदलणे, पंपहाऊस मधील मेन पॅनलची केबल नवीन लग भरुन जोडणे, गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथील वॉश वॉटर पंपाची पाईपलाईन दुरुस्ती व चेहेडी पंपींग स्टेशन येथील चेंज ओव्हर पॅनल बदलणे व इलेक्ट्रिसिटी चार्जिंग करुन ट्रायल घेणे, तसेच विदयुत विभागाचे एल.टी लाईन उभारणी करणे आवश्यक आहे.

गंगापूर धरण, चेहेडी पंपींग स्टेशन व मुकणे धरण पंपींग स्टेशन येथील वीज पुरवठा सोमवार दि.13/01/2020 रोजी बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे दि.13/01/2020 रोजी गंगापूर धरण, चेहडी बंधारा व मुकणे धरण पंपींग स्टेशन येथे रॉ वॉटर पंपींग होणार नाही. त्यामुळे संपूर्ण नाशिक शहरात दि. 13/01/2020 रोजी सकाळी 9.00 वाजे पासून संपूर्ण दिवसभर व सायंकाळी पाणी पुरवठा होणार नाही. तसेच मंगळवारी दि. 14/01/2020 रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. Water Supply Nashik NMC

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.