नाशिक : प्रतिनिधी दिवाळीच्या निमित्ताने लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप.सोसायटी लि.कडून ‘सेल्फी विथ रांगोळी’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. नुकताच सदरच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. लोकमान्यच्या सिडको शाखेत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम भाजप नेत्या आणि माजी स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके – आहेर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी विजेत्यांना चांदीची नाणी लोकमान्यकडून बक्षीस म्हणून देण्यात आली.Selfie with Rangoli
यावेळी बोलतांना आडके यांनी सांगितले की, लोकमान्यच्या ऑनलाईन स्पर्धेच्या माध्यमातून कोरोना काळात समाजामध्ये सकारात्मकता निर्माण करण्यात मदत झाली असून लोकांमध्ये नक्कीच उत्साह निर्माण झाला असे सांगितले. लोकमान्यकडून नेहमीच अनेक विविध उपक्रम राबविले जातात. ही परंपरा कायम ठेवत यंदा दिवाळीसाठी अनोखी रांगोळी स्पर्धा घेतली. ही स्पर्धा पारंपरिक रांगोळी, संस्कार भारती रांगोळी किंवा मुक्तहस्त रांगोळी यावर आधारित होती. सदरच्या रांगोळीसोबत आपला पारंपरिक वेशभूषेतला सेल्फी काढून पाठवायचा होता. यावेळी एकूण ५०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. तर भारती सोनवणे यांनी रांगोळीचे परीक्षण केले.
स्पर्धेचा निकाल असा
लोकमान्यच्या नाशिकमधील चारही शाखांमधून विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये वैष्णवीकाळे(सिडको), संजना पाटकर(इंदिरानगर), प्रज्ञा कदम(नाशिकरोड), मेधा बाविस्कर(सावरकर नगर) यांना प्रथम क्रमाकांचे बक्षीस मिळाले आहे. साक्षी छोटे (सिडको), अपर्णा नाईक (इंदिरानगर), सिद्धीका दाते (नाशिकरोड), योगिता पाटील (सावरकर नगर) यांनी दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पटकाविले आहे. वैष्णवी बैरागी (सिडको), प्राजक्ता थोरात (इंदिरानगर), नेहा मालविया (नाशिकरोड) आणि शीतल काळे (सावरकरनगर) यांना तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.Selfie with Rangoli