लोकन्यायालयाबाबत लोक जागरण शिबिर : लासलगाव येथे गुरूवारी उपक्रम

लासलगाव (वार्ताहर समीर पठाण) : राष्ट्रीय लोकन्यायालयांतर्गत निफाड जिल्हा सत्र न्यायालयात होणाऱ्या लोकन्यायालयात  जास्तीत जास्त दावे निकाली होण्याकरिता लोकसहभाग वाढीस लागावा. या उद्देशाने लासलगाव येथील कमलाकर थिएटरमध्ये गुरूवारी सकाळी 29 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता लोक जगरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकचे जिल्हा प्रधान न्यायाधीश  सूर्यकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. lok nyayalay jagaran shibir loksahabhag niphad sessions court lasalgaon news

या लासलगाव येथील कार्यक्रम प्रसंगी निफाडचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस सी मगरे, जिल्हा सत्र न्यायाधीश ए जी मोहबे, जिल्हा व सत्र न्यायाधीश  पी.डी.दिग्रसकर, नाशिक येथील प्रमुख न्यायदंडाधिकारी सुधीर बुक्के, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश आर आर हस्तेकर, न्या.आर एम सातव, न्या एस बी काळे, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम एस कोचर, न्या एस के दुगांवकर, संयोजक लोकनेते  दत्ताजी पाटील बॅंकेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, लासलगाव सरपंच संगीता शेजवळ, तसेच निफाड  वकील संघाचे अध्यक्ष अॅड.जी.एन शिंदे, उपाध्यक्ष  अॅड.बी.के.जंगम, सचिव अँड. संजय दरेकर वकील संघाचे पदाधिकारी व वकील सदस्य उपस्थित  राहणार आहेत. lok nyayalay jagaran shibir loksahabhag niphad sessions court lasalgaon news

निफाड नगरपंचायत,तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत, विविध संस्था,पतसंस्था राष्ट्रीयकृत बँका यांचे वादपुर्व सुमा प्रकरणे, न्यायप्रविष्ट प्रकरणे  दि .22 एप्रिल  रोजी होणाऱ्या  लोकन्यायालयात तडजोडी साठी न्यायालयात ठेऊन आपला वेळ व पैसा वाचवावा अशी जनजागृती या कार्यक्रमात होणार आहे. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

lok nyayalay jagaran shibir loksahabhag niphad sessions court lasalgaon news

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Connect with Us on WhatsApp : 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.