अंत्यविधीसाठीची २० जणांची अट शिथिल; लग्न समारंभात ५० लोकांचे बंधन कायम

नाशिक : कोरोना लॉकडाऊनचा चौथा टप्पा घोषित करताना शासनाने जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न केला त्यानुसार पूर्वी अंत्यविधीत सहभागी होण्यासाठी केवळ 20 लोकांनाच परवानगी होती. आता ती वाढवत पन्नास करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना संकटांमध्ये मृत्यू पावलेल्या आप्तेष्ट नातेवाईक यांना आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अंतिम क्षणी सोबत राहता येणार आहे. दरम्यान लग्नविधी साठी मात्र ५० लोकांची सहभागी होण्याची अट कायम आहे. Funeral attend corona lockdown

महाराष्ट्रात कोरोना बधितांची संख्या रोजच वाढत असल्याने राज्य शासनाने 18 मे नंतर राज्यात लॉकडाऊन वाढविला. लॉकडाऊन चा चौथा टप्पा 30 मे पर्यंत घोषित केल्यानंतर त्या आधारावर स्थानिक स्तरावर जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र आदेश जाहीर केले. त्यानुसार लॉक डाऊन 3 मध्ये ज्या बाबींना परवानगी दिली नव्हती अशा बाबी चौथ्या टप्प्यात सुरु करण्यास अनुमती दिली.

यातून सर्वसामान्य माणसाला विशेष अडचण येणार नाही. जनजीवन सुरळीत सुरू राहील याची काळजी घेण्यात आली. त्यातूनच अंत्य विधीसाठी गर्दी होऊ नये म्हणून पहिल्या टप्प्यात केवळ 20 व्यक्तीच सहभागी होऊ शकतील असे आदेश दिले होते.

आता त्यात काहीशी सूट देत 50 लोकांना सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. तर विवाह समारंभात 50 जण सहभागी होण्याची पूर्वीचीच अट कायम ठेवली आहे. Funeral attend corona lockdown

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.