लोडशेडिंग होत राहणार : कृषिग्राहकांच्या वीज वेळापत्रकात तात्पुरता बदल

कृषिग्राहकांच्या वीज वेळापत्रकात तात्पुरता बदल  विजेच्या उपलब्धतेत सुधारणा होताच पूर्वीप्रमाणे वीज

नाशिक : वीज निर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व पुरवठयामध्ये अडचणी येत असल्यामूळे  राज्यात तात्पूरते भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे विजेची उपलब्धता व मागणी यांचे नियोजन करण्यासाठी कृषिग्राहकांच्या वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

राज्यात कृषिपंपासाठी ज्या ठिकाणी स्वतंत्र वाहिन्या उभारल्या आहेत व ज्या ठिकाणी सिंगल फेजिंग योजना आहे अशा वाहिन्यांवर सद्यपरिस्थितीत दिवसा 8 तास व रात्री 8 तास अशा दोन टप्प्यांमध्ये चक्राकार पध्दतीने रात्री 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यन्त अखंडित वीजपुवठा करण्यात येत आहे. विजेच्या उपलब्धतेत सुधारणा होताच कृषिपंपांना दिवसा 8 तास व रात्री 10 तास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करीत असून लघु निविदेद्वारे खुल्या बाजारातून वीज खरेदी करण्यात येत आहे. याशिवाय पॉवर एक्सचेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरु आहेत. ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे कोळसा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.