leopard in nashik दारणा नदीकाठच्या गावात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करायला यश

नाशिकमध्ये १० दिवसात २ बिबटे जेरबंददारणा नदीकाठच्या गावात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी बिबट्या अडकला.  गेल्या महिनाभरापासून बिबट्याच्या संचारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. वनविभागाच्या पथकाकडून या भागात सुमारे १७ पिंजरे तैनात करून विविध प्रयोग राबवित कौशल्यपणाला लावून बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. यामुळे दहा दिवसांत दोन बिबटे जेरबंद करण्यास नाशिक पश्चिम वनविभागाला यश आले.  leopard in nashik


सामनगावातील पोलीस पाटील मळ्यात राहणारे एकनाथ जगताप यांच्या घराच्या अंगणात खेळणा-या ओम विष्णू कडभाने (४) या चिमुकल्यावर बिबट्याने २८ जून ला हल्ला केला होता.

सुदैवाने या हल्ल्यात ओमचे प्राण वाचले. या पाटील मळ्यापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या बळवंत मुरलीधर जगताप यांच्या गट क्रमांक-८१लगत लावलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट्या पहाटे भक्ष्याच्या शोधात अडकला. पिंज-यात बिबट्या गुरगुरूत डरकाळ्या फोडू लागल्याने सकाळी शेतावर जाण्यासाठी निघालेल्या गावकऱ्यांचे त्याकडे लक्ष गेले. त्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाला त्याबाबत माहिती दिली. 


दारणाकाठालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचा धूमाकूळ सुरू असून ३८ ट्रॅप कॅमेरे आणि २० पिंजरे या भागात वनविभागाकडून लावण्यात आले आहेत.  याआधी २ जुलैला जाखोरीत बबलू सय्यद यांच्या शेतात लावलेल्या पिंज-यात बिबट्याची मादी जेरबंद झाली होती. त्यानंतर सोमवारी येथून अवघ्या सहा ते सात किलोमीटरवर असलेल्या सामनगावात प्रौढ नर बिबट्या पिंज-यात अडकला. leopard in nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.