निफाड येथील तारूखेडला बिबट्या अखेर जेरबंद

निफाड येथील तारूखेडला बिबट्या अखेर जेरबंद
नाशिक –अनेक महिन्यापासून निफाड तालुक्यात दहशत माजवलेल्या बिबट्याला अखेर वनविभागणे जेरबंद केले आहे. या बिबट्याचा वावर  तारुखेडा गावाजवळ  असल्याने ग्रामस्थ आणि शेतात काम करणारे शेतकरी, कामगार फार  भयभीत झाले होते. अखेर वनविभागाला तारुखेडा गावातील एका शेतात बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.

तारुखेडले गावातील एका ऊसाच्या शेताच्या बांधालगत असलेल्या एका शेतमजूराच्या घराजवळील अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षीय बालिकेवर बिबट्याने संध्याकाळी हल्ला केला होता. या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संपुर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात होती. तेव्हापासून वनविभागाने या भागातील उसाच्या शेतांमध्ये पिंजरे लावले होते.
निफाड तालुक्यातील काही गावांमध्ये बिबट्याने थेट गावात घुसून हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा परिस्थीत तारुखेडाजवळही बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांनी वनविभागाला या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने पावले उचलत एका शेतात पिंजरा लावला.
अपेक्षेनुसार आज सकाळी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. वनविभागाच्या माहितीनुसार या बिबट्याचे वय अंदाजे १० वर्षे आहे. या बिबट्याला सध्या निफाड वनविभागाच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे.

नाशिक मधील घडत असलेल्या घटना, महिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com  हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक,उत्तर महाराष्ट्र, राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती, प्रेस नोट, प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रम,  आपल्या आजूबाजूला घडणारी घटना, सत्कार, सभारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, कृषी, व्यक्ति विशेष, संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य, समाज सेवक कार्य, आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता.या सर्व गोष्टी‍ंची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन, शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो.

प्रसिद्धी पत्रक, निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.

आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com

Twitter       :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook   :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.